शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नासाठी धमकी; हातात पिस्तुल घेतलेला फोटो दाखवत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:44 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणीला रस्त्यात गाठून लग्न कर नाही, तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली.

Ahilyanagar Crime : हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी (५ ऑक्टोबर) घडला. गेल्या आठ वर्षांपासून पाठलाग करून तो तिला त्रास देत होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ओंमकार ज्ञानेश्वर सुपेकर (रा. वाणीनगर, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना २०१७ मध्ये तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. मित्र समजून ती त्याच्याशी बोलत होती.

ती मित्र समजत होती, त्याने लग्नाची स्पप्ने रंगवली

२०२० मध्ये त्याने फोन करून तिला लग्नासाठी मागणी घातली. तिने लग्नास नकार दिला. त्याचा त्याला राग आला. त्याने तरुणीला शिवीगाळ करत दमदाटी केली, तसेच घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तरुणीने त्याचा मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टला टाकला, तरीही तो तिला त्रास देत होता. 

दुसऱ्यांच्या फोनवरून धमकावत होता. ही बाब तिने घरच्यांना सांगितली. नातेवाइकांनी त्याच्या आई-वडिलांना समजावून सांगितले. त्यांनीही यापुढे असे होणार नाही, अशी खात्री दिली. 

रस्त्यात गाठले आणि जीवे मारण्याची धमकी दिली

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने ती क्लासला जात होती. २०२३ मध्ये त्याने तिला क्लासच्या समोर गाठले व दुचाकीची चावी घेऊन त्रास दिला. तेव्हापासून तो तिला त्रास देत होता. रविवारी त्याने तिला गाठले. हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवित लग्न कर, अशी धमकी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Girl preparing for exam threatened for marriage; gun photo shown.

Web Summary : A girl preparing for competitive exams was threatened for marriage by a stalker who showed her a gun photo. He had been harassing her for eight years. Police have registered a case against the accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhilyanagarअहिल्यानगरPoliceपोलिसStudentविद्यार्थी