सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक उलटला...नाशिक-पुणे महामार्ग; वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:36 IST2022-11-20T13:36:20+5:302022-11-20T13:36:33+5:30
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी (दि. २० नोव्हेंबर ) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला.

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक उलटला...नाशिक-पुणे महामार्ग; वाहतूक विस्कळीत
रामप्रसाद चांदघोडे
घारगाव ( जि. अहमदनगर): चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी (दि. २० नोव्हेंबर ) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पसरल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रक क्रमांक एम. एच. २३ डब्ल्यू ४६४७ मधून चालक (नाव समजू शकले नाही ) सिमेंटचे ब्लॉक घेऊन नाशिक - पुणे महामार्गाने नाशिककडून पुण्याच्या दिशेने चालला होता. ट्रक रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान, संगमनेर तालुक्यातील माहुली परिसरात आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला. ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यात चालक गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनेश शिंदे सुनिल साळवे,नंदकुमार बर्डे ,योगीराज सोनवणे ,अरविंद गिरी, घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे, गणेश लोंढे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले आहे.