वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:08 IST2025-04-04T17:08:03+5:302025-04-04T17:08:18+5:30
अपघातात पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू
कोपरगाव : भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी गोदावरी नदीत कोसळली. या अपघातात पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे दोन वाजता घडला.
जीत रामदास गर्जे (वय २५, रा. निवारा, कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात यश धुमाळ हा जखमी झाला असून, त्याला नाशिक येथे उपचारार्थ दाखल केले आहे. जीत गर्जे व पोलिसांना कळवली. पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. जीत गर्ने यास ग्रामीण रुग्णालयात नेले असताना तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. डिकले यांनी तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, जखमी यश धुमाळ यास प्रथम कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात व नंतर नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तो गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.