Ahilyanagar: अहिल्यानगरात विद्यार्थ्यांची शालेय सहलीची बस उलटली; १३ मुले, ५ शिक्षक जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:02 IST2026-02-12T13:01:13+5:302026-02-12T13:02:15+5:30

School Trip Bus Overturns in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या आनंदाने निघालेल्या शालेय सहलीच्या बसला अपघात झाला असून १३ मुलांसह पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

A school trip bus carrying students overturns in Ahilyanagar; 13 children, 5 teachers injured! | Ahilyanagar: अहिल्यानगरात विद्यार्थ्यांची शालेय सहलीची बस उलटली; १३ मुले, ५ शिक्षक जखमी!

Ahilyanagar: अहिल्यानगरात विद्यार्थ्यांची शालेय सहलीची बस उलटली; १३ मुले, ५ शिक्षक जखमी!

संगमनेर ( जि. अहिल्यानगर): नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी (दि.१२) सकाळी ८ वाजता भीषण अपघात झाला. अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी गावाच्या हद्दीत (एमएच १४ एलएक्स ६७४७) या बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी शिवनेरी किल्ल्यावर शैक्षणिक सहलीसाठी निघाले होते. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व काही पालकही उपस्थित होते. सकाळच्या सुमारास बस खामुंडी गावाजवळ पोहोचत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि पुढील टायर फुटला. चालकाने बस सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र वेग आणि अचानक झालेल्या बिघाडामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात १३ मुले व पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले असून एकूण किती विद्यार्थी बसमध्ये होते, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
          
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि इतर वाहनचालकांनी मदतकार्य सुरू केले. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी लवाजम्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणून जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.

दरम्यान येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून शालेय सहलींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. या घटनेमुळे सहलीच्या आनंदावर विरजण पडले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : अहिल्यानगर में स्कूली बस पलटी; छात्र, शिक्षक घायल!

Web Summary : अहिल्यानगर में एक स्कूल बस दुर्घटना में 13 छात्र और 5 शिक्षक घायल हो गए। खामुंडी गांव के पास टायर फटने से बस पलट गई। घायलों को तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया; पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : School trip bus overturns in Ahilyanagar; students, teachers injured!

Web Summary : A school bus accident in Ahilyanagar injured 13 students and 5 teachers. The bus overturned due to a tire burst near Khamundi village. Injured were promptly hospitalized; police are investigating the incident.