शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

९८१ ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी

By admin | Updated: September 30, 2024 13:21 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून १ हजार ३१६ ग्रामपंचायतींपैकी ९८१ ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येते. यात ग्रामपंचायतींचे दप्तर, कॅश बुक, मासिक सभा आणि ग्रामसभांचे इतिवृत्त, विकास योजनांचे कॅश बुक, कर वसुली, पाणीपट्टी वसुली, राज्य सरकार, जिल्हा परिषद यांच्याकडून देण्यात येणारा १५ टक्के मागासवर्गीयांचा निधी, १० टक्के महिला व बालकल्याण आणि ३ टक्के अपंगाचा निधी खर्च झाला की नाही, याची तपासणी यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ही तपासणी करण्यात आली आहे. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींची आकडेवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन यांनी दिली. तपासणी झालेल्या ग्रामपंचायतींचा निकर्षासह अहवाल महिनाभरात जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. या तपासणीत अनियमितता आढळणाऱ्या ग्रामपंचायतींवर करवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. येत्या महिनाअखेर पर्यंत जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींची तपासणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)