राहुरी : डासांचे प्रमाण वाढल्याने राहुरी तालुक्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ८ वर पोहचली आहे़ चिकनगुणियाचेही रूग्ण ४ झाले आहेत़ व्हायरल इनफेक्शनमुळे दवाखान्यामध्ये जागा शिल्लक नाही, त्यामुळे रूग्णांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत़ राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर यांच्याशी सोमवारी संपर्क साधला असता, राहुरी शहरात आतापर्यंत ५ रूग्ण डेंग्यूचे तर ग्रामीण भागात ३ रूग्ण आढळून आले़ याशिवाय याशिवाय चिकनगुनियाचे ३ रूग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले़आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक जी़ बी़ बहीरवाल म्हणाले, खाजगी डॉक्टरांकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर लागलीच घटनास्थळी जाऊन आरोग्य विषयक माहिती दिली जात आहे़ डास निर्मूलनासाठी प्रबोधन केले जात आहे़ राहुरी नगर परिषदेने औषधाची फवारणी सुरू केल्याचे सांगण्यात आले़ मात्र यंत्रणा अपुरी असल्याने डास निर्मूलनाला मर्यादा आल्या आहेत़विषाणुमूळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढल्याने राहुरी शहरातील दवाखाने खच्चुन भरले आहेत़ हॉस्पिटलच्या स्टोअरमध्येही पेशंटला दाखल करून घेण्याची कसरत करावी लागत आहे़ हॉस्पिटल अपुरे पडल्याने अनेक रूग्ण घरी उपचार घेत आहेत़ अहमदनगर, श्रीरामपूर आदी ठिकाणी रूग्ण उपचार घेणे पसंत करीत आहेत़(तालुका प्रतिनिधी)
राहुरीत डेंग्यूचे ८ रूग्ण
By admin | Updated: September 6, 2016 00:48 IST
राहुरी : डासांचे प्रमाण वाढल्याने राहुरी तालुक्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ८ वर पोहचली आहे़ चिकनगुणियाचेही रूग्ण ४ झाले आहेत़ व्हायरल इनफेक्शनमुळे दवाखान्यामध्ये जागा शिल्लक नाही
राहुरीत डेंग्यूचे ८ रूग्ण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}