संगमनेरात ३०० किलो गोमांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 17:00 IST2021-01-20T17:00:01+5:302021-01-20T17:00:13+5:30
गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत ३०० किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) पहाटे साडे पाचच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी येथे करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संगमनेरात ३०० किलो गोमांस जप्त
संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत ३०० किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) पहाटे साडे पाचच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी येथे करत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फरमान मुंने कुरेशी (मूळ रा. उत्तरप्रदेश, हल्ली रा. भारत नगर, संगमनेर) व परवेज कुरेशी (जमजम कॉलनी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉस्टेबल ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रमेश लबडे अधिक तपास करीत आहेत.