पाचेगाव : आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामार्फत पुनतगाव (ता. नेवासा) येथे दोन दिवस कोरोना रॅपिड अँटिजन चाचणी शिबिर घेण्यात आले. २७८ जणांच्या चाचणीत ३० जण कोरोनाबाधित आढळून आले. त्या सर्वांना भेंडा येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी बाधितांच्या कुटुंबातील ८६ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांचा अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी गावातील तरुणांनी अथक परिश्रम घेतले. नागरिकांचे देखील सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच सुदर्शन वाकचौरे, नेवासा बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सोमनाथ यादव, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. दीपक मिसाळ, डॉ. प्रांजली जाधव, डॉ. संदीप भालेराव, आरोग्यसेवक प्रकाश पाठक, योगेश भोटकर, रावसाहेब कुंढारे, भाकरे, आशासेविका शुभांगी सुपेकर, शारदा काळे, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
170521\img-20210516-wa0134.jpg
नवे पुनतगाव येथे कोरोनाच्या रॅपिड अँटीजन चाचण्या करताना आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी.