कुकडी प्रकल्पात यंदा २० टक्के पाणीसाठा कमी; सीना धरण ८८ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:55 IST2020-07-29T11:54:47+5:302020-07-29T11:55:54+5:30
कुकडी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र कुकडी धरण पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे २९ जुलै अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये २० टक्के पाणी साठा कमी आहे.

कुकडी प्रकल्पात यंदा २० टक्के पाणीसाठा कमी; सीना धरण ८८ टक्के भरले
श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र कुकडी धरण पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे २९ जुलै अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये २० टक्के पाणी साठा कमी आहे.
गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पात १३ हजार ७८ (४३ टक्के) एमसीएफटी उपयुक्त पाणी साठा होता. यंदा ६ हजार ७६४ (२३ टक्के) उपयुक्त पाणी साठा झाला आहे. तो २० टक्के कमी आहे.
येडगाव धरणात ७०३ एमसीएफटी (३६ टक्के) उपयुक्त पाणी साठा आहे. ४७० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
माणिकडोह धरणात १ हजार १५८ एमसीएफटी (११ टक्के) पाणी आहे. पाणलोट धरणात अवघा २३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
वडज धरणात ३६८ एमसीएफटी (३१ टक्के) पाणी साठा आहे. येथे १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
डिंबे धरणात ४ हजार ५३५ एमसीएफटी (३६ टक्के) पाणी साठा आहे. ३८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पिंपळगाव जोगे धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
घोड धरणात १ हजार ७८८ एमसीएफटी (३७ टक्के) उपयुक्त पाणी साठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
विसापुर तलावात २४३ एमसीएफटी (२७ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात १८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कर्जत तालुक्यातील सीना धरणात १ हजार ६१८ एमसीएफटी (८८ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ही समाधानाची बाब आहे. मात्र जामखेडच्या खैरी तलावात २१७ एमसीएफटी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.