शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६५ माध्यमिक शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

अहमदनगर : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १६५ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांवरील सर्व शिक्षक लसीकरण व ...

अहमदनगर : आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १६५ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांवरील सर्व शिक्षक लसीकरण व कोरोना चाचणी करून शाळेत हजर झाले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक विभागाने दिली.

कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. परंतु शाळा सुरू करताना शिक्षकांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. चाचणी निगेटिव्ह असेल तरच मुख्याध्यापकाने शिक्षकांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. शिक्षकांचे लसीकरण झाले की नाही हेही तपासले जात आहे.

ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. मात्र, एकच डोस घेतलेल्यांना चाचणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात १६ जुलै रोजी १४९ शाळा सुरू झाल्या. या शाळांमध्ये पहिल्या दिवशी दीड हजार शिक्षक कार्यरत झाले. हे सर्व शिक्षक कोरोनाचे नियम पाळूनच शाळेत आले, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

---------------

आठवी ते बारावी एकूण शाळा - १३०१

आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक - १५,०००

पहिल्या दिवशी हजर शिक्षक - १५००

पहिल्या दिवशी हजर विद्यार्थी - १४,७७८

---------

पहिल्या दिवशी १४ हजार विद्यार्थ्यांचा एक साथ नमस्ते

अकोले - ७१८०

संगमनेर - २५१८

कोपरगाव - ८२

राहाता - १६६५

राहुरी- ६१७

श्रीरामपूर- २१४

नेवासा- ११८९

शेवगाव- १६४

पाथर्डी- १९८

जामखेड- ७०

कर्जत- ८०

श्रीगोंदा- ३५२

पारनेर- ३२

नगर- ४१७

एकूण - १४,७७८

------------

पहिल्या दिवशी १५१ शाळा उघडल्या

नगर जिल्ह्यात आठवी ते बारावी १३०१ शाळा असून, त्यात पहिल्या दिवशी १५१ शाळा उघडल्या. पहिल्या दिवशी सुमारे १४ हजार ७७८ विद्यार्थी हजर होते.

------------------

दोन कॉलम फोटो - २१स्कूल ओपेन