ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात, १४ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:09 IST2020-10-21T17:09:02+5:302020-10-21T17:09:49+5:30
उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका कारने हूल दिल्याने ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडला.

ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात, १४ जण जखमी
संगमनेर :उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका कारने हूल दिल्याने ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात घडला. जखमींमध्ये ऊसतोड मजूर व त्यांची लहान मुले असे एकूण १४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ऊस तोड मजूर हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील आहेत. ऊसतोड करून ऊस साखर कारखान्यात घेऊन जात असताना हा अपघात झाला. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. यातील काहींना गंभीर मार लागला आहे. त्यांच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. |