शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःतल्या रावणाचे दहन केव्हा करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 12:25 IST

आपण बघत असतो की आजकाल बहुतांश लोक भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन, कामचुकार आणि व्यसनांमध्ये गुरफटलेले असतात. बेइमानीने अमाप संपत्ती जमवली जाते.

दसरा सणाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गावोगावी व प्रत्येक शहरात रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. दरवर्षी दसरा सणाच्या दिवशी रावणाचे भले मोठे पुतळे उभारून, फटाक्यांची आतषबाजी करून रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. परंतु जे लोक रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यासाठी पुढाकार घेतात आणि ज्यांच्या हस्ते रावणाचे दहन केले जाते ते सगळे लोक खरोखरच नेक, इमानदार, चारित्र्यवान, प्रामाणिक असतात का? चांगल्या विचारांचे आणि शुद्ध नीतीचे असतात का? 

आपण बघत असतो की आजकाल बहुतांश लोक भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन, कामचुकार आणि व्यसनांमध्ये गुरफटलेले असतात. बेइमानीने अमाप संपत्ती जमवली जाते. गोरगरिबांचे शोषण करायचे, जातीयता पाळायची, धर्मांधता बाळगायची, कट-कारस्थान करायचे, मोठ्या पगाराची नोकरी असली तरीही वरकमाईसाठी लाच मागायची, वरकमाईतून चंगळवादी जीवन जगायचे, जीवनात ऐश करायची.. हे सर्रास सुरू आहे. काल्पनिक रावणाचे पुतळे जाळून क्षणाचा आनंद मिळतो, पण स्वतःमध्ये दडलेला दुर्गुणी रावण आपण केव्हा जाळणार आहोत? आपल्यामध्ये असलेला अहंकार, संपत्तीचा मोह, हेवा, मत्सर आणि वासना यांचेही दहन करा. मदिरा, सिगारेट, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे अमाप नुकसान होत असते. हे लक्षात घेऊन रावणाच्या पुतळ्याबरोबर आपले व्यसनही कायमचे जाळून टाका. रावणाच्या पुतळ्यांसंगे आपल्या अंगी भिनलेली भ्रष्टाचाराची व लाच घेण्याची कुप्रवृत्ती कायमची दहन करा. 

दरवर्षी दसरा सणाच्या दिवशी रावणाचा पुतळा उत्स्फूर्तपणे जाळायचा, आनंद व्यक्त करायचा आणि घरी परतताना मात्र स्वतःमधला रावण तसाच जिवंत ठेवायचा. याला काय अर्थ? त्यापेक्षा प्रत्येकाने काल्पनिक रावणाचे पुतळे जाळण्यापेक्षा स्वतःमधला दडलेला रावण जाळून टाकला तर सगळे चांगले होईल. समाजात व देशात शांतता नांदेल. आपण सगळे माणूस बनून गुण्यागोविंदाने जीवन जगत राहू. यावर्षी दसऱ्याला आपण स्वतःमधला रावण जाळू. आपण ते करू. नक्की जमेल आपल्याला.- बबन दामोदर गुळवे, उमरगा कोर्ट, ता. अहमदपूर, जि. लातूर

टॅग्स :Dasaraदसरा