Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Friday, November 8, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

आज जन्मलेली मुलं 
मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांच्या कार्यपद्धतीवर रवि-नेपच्यून नवपंचमयोगाचे प्रतिसाद उमटणार असल्याने विचार, कार्यकृती यामधून यश संपादन करणे सोपे राहील, त्यात गुरुकृपेने प्रबळता येईल. मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

 • शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर २०१९
 • भारतीय सौर १७ कार्तिक १९४१
 • मिती कार्तिक शुद्ध एकादशी १२ क. २५ मि. 
 • पूर्वा भाद्रपदा नक्षत्र १२ क. १२. मि., मीन चंद्र 
 • सूर्योदय ०६ क. ४३ मि. सूर्यास्त ०६ क. ०१ मि. 
 • प्रबोधिनी एकादशी पंढरपूर यात्रा

 

आजचे दिनविशेष 

 • १६५६ - इंग्लिश खगोल शास्त्रज्ञ व गणिती एडमंड हॅले यांचा जन्म, धूमकेतूची कक्षा मोजणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. 
 • १९०९ - स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार नरुभाऊ लिमये यांचा जन्म
 • १९१९ - प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेते म्हणून गाजलेल्या दानशूर पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु. ल. देशपांडे यांचा जन्म
 • १९२९ - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म
 • १९७६ - ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली याचा जन्म 
   
Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang, Friday, November 8, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.