Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, दि. 08 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:18 IST2019-08-08T07:17:53+5:302019-08-08T07:18:06+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, दि. 08 ऑगस्ट 2019
आज जन्मलेली मुलं - 15 क. 26 मि. पर्यंत तुला राशीत मुले असतील. पुढे वृश्चिक राशीच्या संपर्कात मुले राहतील. आधुनिक विचार आणि शिकस्तीचे प्रयत्न यातून मुले यश संपादन करु शकतील. शुक्र-गुरु नवपंचम योगाचे सहकार्य त्यात आकर्षकता निर्माण करील. तुला राशी र, त आद्याक्षर. वृश्चिक राशी न, य आद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 8 ऑगस्ट 2019
भारतीय सौर 17 श्रावण 1941
मिती श्रावण शुद्ध अष्टमी 10 क. 31 मि.
विशाखा नक्षत्र 21 क. 27 मि., तुला चंद्र 15 क. 36 मि.
सूर्योदय 06 क. 19 मि., सूर्यास्त 07 क. 10 मि.
दुर्गाष्टमी
आजचे दिनविशेष
1932 - मराठीतील लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांचा जन्म
1926 - प्रसिद्ध साहित्यिक शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म
1934 - अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक शरद पुजारी यांचा जन्म
1940 - भारतीय क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म
1942 - ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरु
1948 - काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा जन्म
2013 - गायिका तथा अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचे निधन