Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 28 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 09:41 IST2020-03-28T09:40:06+5:302020-03-28T09:41:05+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 28 मार्च 2020
19 क. 30 मि. पर्यंत मेष राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर वृषभ राशीत मुले प्रवेश करतील. शुक्र गुरू नवपंचम योगामुळे अनेक कार्यप्रांतात चमकतील. प्रथा, आधुनिकता यांचा त्यात समावेश राहील.
मीन राशी द, च, मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शनिवार दि. 28 मार्च २०२०
भारतीय सौर 08 चैत्र 1942
मिती चैत्र शुद्ध चतुर्थी 24 क. 18 मि.
भरणी नक्षत्र 12 क. 52 मि.,मेष चंद्र 19 क 30 मि.
सूर्योदय 06 क. 37 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
आजचे दिनविशेष
1916 - पत्रकार आणि समाज सुधारक रामकृष्ण के. पिलाई यांचे निधन.
1925 - मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म.
1926 - माजी क्रिकेट कर्णधार पॉली उम्रीगर यांचा जन्म.
1954 - प्रसिद्ध अभिनेत्री मूनमून सेन यांचा जन्म.
1975 - प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना याचा जन्म.
1992 - स्थानकवासी जैनांचे धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे महानिर्वाण.
1992 - जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न प्रदान.
2000 - अर्थतज्ज्ञ शांताराम द्वारकानाथ तथा राम द्वारकानाथ देशमुख यांचे निधन.