Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 3 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 08:21 IST2019-11-03T08:20:46+5:302019-11-03T08:21:23+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 3 नोव्हेंबर 2019
आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेली मुलं मकर राशीची असतील. चंद्राचा बुध- शुक्रात होणारा शुभयोग विचार आणि कतृत्व यांच्या समन्वयातून प्रबळ यश संपादन करतील. त्यात शिक्षण, उद्योग, परिवार यांचा समावेश राहील. माता पित्यास शुभ. मकर राशी ज, ख अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, 3 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर, 12 कार्तिक 1941
मिती कार्तिक शुद्ध सप्तमी 26 क. 56 मि.
उत्तराषाढा नक्षत्र 24 क. 55 मि., मकर चंद्र
सूर्योदय 06 क. 41 मि., सूर्यास्त 06 क. 03 मि.
भानु सप्तमी
दिनविशेष
1819- शाहीर अनंत फंदी यांचे निधन.
1906- प्रख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म.
1917- स्वातंत्र्य संग्रामातील सक्रिय सेनानी अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म.
1925- प्रबंधलेखक, संपादक डॅा. हे. वि. इमानदार यांचा जन्म.
1933- नोबेल पारितोषिक प्राप्त मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.
1990- लोकप्रिय चरित्र अभिनेते मनमोहन कृष्ण यांचे निधन.
1992- हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेमनाथ यांचे निधन.