Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, ८ डिसेंबर २०१९
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 08:54 IST2019-12-08T08:53:45+5:302019-12-08T08:54:13+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, ८ डिसेंबर २०१९
आजचे पंचांग
रविवार दि. 8 डिसेंबर 2019
भारतीय सौर 17, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी 08 क. 30 मि.
आश्विनी नक्षत्र 27 क. 01 मि. सूर्यास्त 06 क. 00 मि.
मोक्षदा एकादशी, गीता जयंती
आज जन्मलेली मुलं
मेष राशीत असलेली आजची मुले चंद्र-गुरू नवपंचम योगामुळे कार्यपथावरील अधिकाधिक प्रवास सफल करू शकतील. त्यात शिक्षण राहील. व्यवहार असेल. परंपरा असतील. मातापित्यास शुभ.
मेष राशी अ, ल, ई, अद्याक्षर
दिनविशेष
1720 - बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचा जन्म.
1877 - महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित नारायण सदाशिव मराठे यांचा जन्म.
1897 - कवी पंडित बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचा जन्म.
1900 - जगदविख्यात नर्तक उदयशंकर यांचा जन्म.
1935 - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.
1944 - प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.
1978 - इस्राइलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन.