Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 13 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 07:53 IST2020-03-13T07:53:16+5:302020-03-13T07:53:40+5:30
नवीन कल्पना आणि विचारातील निर्धार यातून सफल प्रवास सुरू राहील.

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 13 मार्च 2020
30 क. 41 मि. पर्यंत जन्मलेली आजची मुले तुला राशीत जन्मलेली असतील. त्यानंतरची मुले वृश्चिक राशीच्या सहवासात राहतील. नवीन कल्पना आणि विचारातील निर्धार यातून सफल प्रवास सुरू राहील. त्यात शिक्षण, अधिकार, व्यवहार यांचा समावेश राहील. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार दि. 13 मार्च 2020
भारतीय सौर 23 फाल्गुन 1941
मित्ती फाल्गुन वद्य चतुर्थी 08 क. 51 मि.
स्वाती नक्षत्र 13 क. 59 मि., तुला चंद्र 30 क. 41 मि.
सूर्योदय 06 क. 50 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि.
रंगपंचमी
दिनविशेष
1800 पेशवाईतील थोर मुत्सद्दी बाळाजी जनार्दन भानू तथा नाना फडणवीस यांचं निधन
1893 जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म
1999 ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचे निधन
1926 मराठी साहित्यिक रवींद्र रामचंद्र पिगे यांचा जन्म
1996 रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन यावर आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन
2003 मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट
2004 प्रख्यात सितारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन