Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 15 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 09:48 IST2019-04-15T09:48:07+5:302019-04-15T09:48:42+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 15 एप्रिल 2019
आज जन्मलेली मुलं
सिंह राशीत जन्मलेली मुलं रवि-चंद्र नवपंचम-योगामुळे कार्यप्रांतात चमकत राहतील. स्वत:च सफल विश्व, बौद्धिक प्रांत, सामाजिक विभाग, अधिकार, दूरचे प्रवास यांच्यामधून त्याची प्रचिती येईल. माता, पित्यास शुभ.
सिंह - राशी. म, ट, आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
सोमवार, दि. 15 एप्रिल 2019
भारतीय सौर 25 चैत्र 1941
मिती चैत्र शुद्ध दशमी 07 क. 08 मि.
मघा नक्षत्र 28 क. 1 मि., सिह चंद्र
सूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.
दिनविशेष
1794 आर्या या वृत्तातील महान रचनाकार कविवर्य मोरोपंत पराडकर यांचे बारामती येथे निधन. त्यांनी केलेल्या आर्यांचीच संख्या 60 हजारांच्यावर आहे.
1893 पत्रकार व इतिहास संशोधक नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक यांचा जन्म.
1912 ब्रिटीश जहाज टायटानिक हे हिमनगाशी टक्कर होऊन उत्तर अलटलांटिक महासागरात बुडाले.
1922 हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म
1932 प्रसिद्ध कवी, गझलसम्राट सुरेश श्रीधर भट यांचा जन्म