Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 4 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 08:58 IST2020-03-04T08:56:44+5:302020-03-04T08:58:14+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 4 मार्च 2020
मिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांनी चंद्र-बुध नवपंचम योगाचे सहकार्य मिळणार आहे. बौद्धिक क्षेत्रात यश, व्यवहारातील सफलता त्यांची केंद्र राहतील. चंद्र शुक्र योगामुळे कलाप्रांताशी संपर्क येऊ शकतील.
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 4 मार्च 2020
भारतीय सौर 14 फाल्गुन 1941
मिती फाल्गुन शुद्ध नवमी 14 क. 00 मि.
मृग नक्षत्र, 11 क. 23 मि.
सूर्योदय 06 क. 57 मि., सूर्यास्त 06 क. 44 मि.
दिनविशेष
1922 - हिंदी, गुजराती चित्रपट अभिनेत्री दिना पाठक हिचा जन्म.
1925 - रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू साहित्यिक, चित्रकार ज्योतिंद्रनाथ टागोर यांचे निधन.
1935 - काँग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
1985 - साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे निधन.
1995 - चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचे निधन.
1996 - नाटककार आत्माराम सावंत यांचे निधन.
2000 - कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या गीता मुखर्जी यांचे निधन.
2011 - राजकीय नेते अर्जुन सिंह यांचे निधन.