Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 10 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 08:58 IST2019-07-10T08:58:05+5:302019-07-10T08:58:24+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 10 जुलै 2019
तुला राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र, हर्षल प्रतियोगोमुळे अनेक प्रांतात समस्या सोडवूनच सफलता मिळवावी लागेल. अवास्तव विश्वासाने संबंध, संपर्क निर्माण करू नये. गुरुकृपा प्रतिष्ठा, परिवार सांभाळतील.
तुला राशी र, त अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, दि. 10 जुलै 2019
भारतीय सौर, 19 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध नवमी 26 क. 3 मि.
चित्रा नक्षत्र 16 क. 22 मि. तुला चंद्र
सूर्योदय 06 क. 9 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
दिनविशेष
1923 - स्वातंत्र्योत्तर काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी.
1949 - जागतिक कीर्तीचा क्रिकेटवीर सुनील मनोहर गावस्कर यांचा जन्म.
1956 - अभिनेते अलोकनाथ यांचा जन्म.
1969 - गोव्यातील एक प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन.
1978 - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना.
1989 - मराठी साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रभाकर ऊध्वरिषे यांचे निधन.