Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 19 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 09:44 IST2019-04-19T09:43:42+5:302019-04-19T09:44:47+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 19 एप्रिल 2019
08 क. 25 मि. पर्यंत कन्या राशीची मुलं राहतील. त्यापुढे मुलं तुला राशीत प्रवेश करतील. शिक्षणात यश मिळवतील. कला, संगीताशी संबंध येतील. विचारांमुळे स्वत: चा दरबार निर्माण करू शकतील.
कन्या राशी - प, ठ, ण
तुला राशी र, त आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शुक्रवार, दि. 19 एप्रिल 2019
भारतीय सौर 29 चैत्र 1941
मिती चैत्र शुद्ध पौर्णिमा 16 क. 42 मि.
चित्रा नक्षत्र 19 क. 29 मि., कन्या चंद्र 8 क. 25 मि.
सूर्योदय 06 क. 20 मि., सूर्यास्त 06 क. 56 मि.
श्रीहनुमान जयंती
दिनविशेष
1892 - शिक्षणतज्ञ व पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांचा जन्म. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
1910 - क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे यांना फाशी देण्यात आली.
1930 - सुप्रसिद्ध गायिका मालती पांडे यांचा जन्म.
1975 - भारताचा पहिला उपग्रह आर्यभट याचे प्रक्षेपण.
1977 - ऑलिम्पिक विजेती अंजू बॉबी जॉर्ज हिचा जन्म.