Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 12 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 09:15 IST2019-04-12T08:48:45+5:302019-04-12T09:15:06+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 12 एप्रिल 2019
27 क. 15 मि. पर्यंत मिथुन राशीची मुलं असतील. पुढे कर्क राशीचा जन्मप्रांत राहील. शुक्र-शनि शुभयोगाचे सहकार्य प्रयत्न, प्रगतीच्या समन्वयासाठी उपयुक्त ठरतील. कला, संगीत, विज्ञान या विभागांशी संपर्क राहतील. अधिकार आणि व्यापार यात यश.
मिथुन राशी क, छ, घ.
कर्क राशी ड, ह आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शुक्रवार , दि. 12 एप्रिल 2019
भारतीय सौर 22 चैत्र 1941
मिती चंद्र शद्ध सप्तमी 13 क. 24 मि.
आर्द्रा नक्षत्र 09 क. 54. मि. मिथुन चंद्र 27 क. 15 मि.
सूर्योदय 06 क. 25 मि., सूर्यास्त 06 क. 54 मि.
दिनविशेष
1871 - संपादक आणि कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म.
1910 - प्रतिभासंपन्न लेखक, पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म.
1920 - कथालेखिका , कादंबरीकार, बालसाहित्यकार शैलजा प्रसन्नकुमार राजे यांचा मुंबईत जन्म.
1942 - कथालेखिका सुनीती आफळे यांचा जन्म.
1943 - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा जन्म.
1977 - प्रसिद्ध शिकारकथा लेखक भानू शिरधनकर यांचे निधन.