Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 4 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 09:06 IST2019-03-04T08:55:36+5:302019-03-04T09:06:14+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 4 मार्च 2019
25 क. 44 मि. पर्यंत मकर राशीत अवतीर्ण झालेली मुलं असतील. पुढे कुंभ राशीचा प्रभाव राहील. हुशारी आणि कल्पकता यामधून यश संपादन करणारी मुलं असतील. शिक्षण, न्याय विभागाशी संबंध राहतो.
मकर राशी ज, ख, कुंभ राशी ग, स आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 4 मार्च 2019
- भारतीय सौर 13 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य त्रयोदशी, 16 क. 29 मि.
- श्रावण नक्षत्र 12 क. 10 मि., मकर चंद्र 25 क. 44 मि.
- सूर्योदय 06 क. 57 मि., सूर्यास्त 06 क. 44 मि.
- महाशिवरात्र
दिनविशेष
1852 - रशियन नाटककार, कथा, कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.
1922 - हिंदी, गुजराती चित्रपट अभिनेत्री दिना पाठक हिचा जन्म.
1935 - काँग्रेसच्या नेत्या, माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांचा जन्म.
1961 - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतचे कार्य सुरू.
1985 - साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे निधन.
1996 - नाटककार, संपादक आत्माराम सावंत यांचे निधन.
2011 - राजकीय नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांचे निधन.