Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 09:37 IST2019-02-12T09:30:35+5:302019-02-12T09:37:47+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019
28 क. 19 मि. पर्यंत चंद्र-मेष राशीत राहील. त्यानंतर मुलं वृषभ राशीत प्रवेश करतील. विचारांचा प्रभाव आणि कल्पक कृती अशा विचार प्रवाहात मुलं यश मिळवित पुढे सरकतील. त्यात शिक्षण ते उद्योग वर्तुळ असतील.
मेष राशी अ, ल, ई, वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 12 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 23 माघ 1940
- मिती माघ शुद्ध सप्तमी, 15 क. 55 मि.
- भरणी नक्षत्र 22 क. 11 मि., मेष चंद्र 28 क. 19 मि.
- सूर्योदय 07 क. 10 मि., सूर्यास्त 06 क. 36 मि.
- रथसप्तमी
दिनविशेष
1742 - पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी नाना फडणवीस यांचा जन्म.
1809 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म.
1928 - वल्लभभाई पटेल यांचा बारडोलीचा सत्याग्रह सुरू.
1949 - क्रिकेटपटू गुंडाप्पा विश्वनाथ यांचा जन्म.
1976 - पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडक्की प्रकल्प देशास अर्पण.
1998 - कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन.
2001 - नाट्यसंमेलनाच्या माजी अध्यक्ष, अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार यांचे निधन.