Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार 23 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 10:14 IST2019-01-23T10:01:19+5:302019-01-23T10:14:25+5:30
सिंह राशीत जन्मलेली आजची मुलं साहसी, स्वाभिमानी राहतील. परंतु बुध-हर्षल केंद्रयोगामुळे अपेक्षित प्रगतीसाठी संयम आवश्यक राहील.

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार 23 जानेवारी 2019
सिंह राशीत जन्मलेली आजची मुलं साहसी, स्वाभिमानी राहतील. परंतु बुध-हर्षल केंद्रयोगामुळे अपेक्षित प्रगतीसाठी संयम आवश्यक राहील. पदवी मिळेल, अधिकार मिळवतील, संशोधन कार्यात मात्र आवास्तव साहस नको.
जन्मनाव - सिंह राशी म, ट
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, 23 जानेवारी 2019
भारतीय सौर 03 माघ 1940
मिती पौष वद्य तृतीया 23 क. 59 मि.
मघा नक्षत्र 20 क. 46. मि, सिंह चंद्र
सूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 25 मि.
दिनविशेष
1664 - कर्नाटकात होद्देगिरी येथे शिकारीच्या वेळी शहाजीराजे भोसले यांचे अपघाती निधन.
1897 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.
1911 - जॅक्सन खूनप्रकरणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर दुसरा खटला सुरू.
1919 - प्रतिभावान साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे निधन.
1920 - उर्दू-मराठी कोशकार, मराठी साहित्यिक श्रीपाद जोशी यांचा जन्म.
1926 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.