शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

...... तर विवाह संस्थेचा पायाच खचेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 22:06 IST

"लैंगिकता हा विषय झाकून ठेवल्याने त्यातील रस वाढला जातोय.

ठळक मुद्दे. प्रेम व शारिरिक सुख या भावनांबाबत समाजात जागृती व ज्ञान देण्याची गरज

डॉ. दत्ता कोहिनकर

आजकाल घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . त्यातून ऐन उमेदीच्या काळात तरुण मुले - मुली डिप्रेशनमध्ये जात आहेत. आयुष्याची वाताहत होत आहे . काही जणांना हे दुःख पचवता नाही आले तर ते आत्महत्येकडे वळत आहेत . पूर्वीच्या रूढीनुसार कांदापोहे व चहाच्या बैठकीत ठरलेली लग्न आज मोडत आहे . पहिल्याच वर्षात संसाराची राखरांगोळी झालेली बऱ्याच ठिकाणी दिसत आहे . त्यातून घटस्फोट दावा , पोलिस , कोर्टकचेरी , कौन्सलिंग , एकमेकांना दहशत , भांडणे , प्रसंगी मारामाऱ्या , अपत्यांची हेळसांड यासारख्या भयंकर प्रकारांनी विवाहसंस्था पोखरली जात आहे . एकरकमी पैसे दिले किंवा घेतले तरी मनाच्या जखमा , भावभावनांचे खुन थांबवणे अवघड झाले आहे . प्रचंड मानहानीने घरे रस्त्यावर येताना दिसत आहेत . हा प्रकार थांबवण्यासाठी बैठकीत पसंती झाली तरी         

आपल्या मुलामुलींना काही काळ एकमेकांबरोबर घालवू द्या . एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना काही महिने द्या . त्यांना स्वातंत्र्य द्या . काही महिन्यानंतर दोघेही स्वभावाने प्रेमाने एकमेकांच्या पसंतीवर उतरले तरच विवाहबंधनाचा निर्णय घ्या . लंगडत चालणाऱ्या हत्तीचा माहूत लंगडत चालायचा, हत्ती त्याच अनुकरण करायचा . म्हणून गौतम बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलण्यास सांगीतले व तद्नंतर हत्ती लंगडायचा थांबला . जसा हत्ती माहूताचे अंधानुकरण करत होता तशाच काही जुन्या चालीरीतीच आपण अंधानुकरण करतोय . मित्रांनो या लंगड्या हत्तीवर उपचार करा . जुन्या चालीरीती जर जीवनात दुःख आणत असतील तर त्या बदला . या बदलाची आज नितांत गरज आहे . संस्कृतीच्या नावावर अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आज समाजाची मोठी हानी केलीय . एका मुलीचे पती लग्नानंतर एकाच वर्षात वारले . ती नैराश्यात चालली होती, तिच्या आई वडिलांशी चर्चा करून तिचे दुसरे लग्न करून दयावयास सांगितले . ते म्हणाले आमच्यात मुलीचा पुर्न:विवाह करत नाही . अशा विधवा स्त्रियांना सामाजिक चालीरीतीमुळे एकटे रहावे लागते . भावभावनांचा निचरा न झाल्याने त्या नैराश्यात जातात. जास्त चौकटीत राहणारी माणसे दुःखी जीवन जगतात . मध्यम मार्ग हा आनंदाचा पाया आहे .   लग्नानंतर मुलाच्या आई वडिलांनी सुनेला धाकात ठेव, डोक्यावर बसवू नकोस व मुलीच्या घरच्यांनी जावयाला आपल्या मुठीत ठेव , सासू सासऱ्यांपासून वेगळ रहा असे सल्ले थांबवले तरच कुटंबव्यवस्था टिकेल. आज मुलामुलींना लैंगिक शिक्षण द्यावयास हवे. "मुलामुलींच्या लैंगिकतेचा विचार आपल्या समाजात केला जात नाही. मुलामुलींशी लैंगिकतेबाबत बोलणंही अनेकवेळा टाळलं जातं. त्यापेक्षा  त्यांना विश्वासात घेऊन  योग्य लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना स्वतःच्या लैंगिक जाणिवा, नातेसंबंध, स्वतःच्या भावना योग्य प्रकारे कश्या हाताळाव्यात हे समजेल. आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, याचं ज्ञान त्यांना स्वतःला येईल, अशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. याबाबत त्यांच्याशी बोललं पाहिजे." लैंगिकता हा विषय झाकून ठेवल्याने त्यातील रस वाढला जातोय . प्रेम व शारिरिक सुख या भावनांबाबत समाजात जागृती व ज्ञान देण्याची आज गरज भासतीय . मुलांची मने आज नुसती मुलींभोवतीच फिरू लागली तर ही मुले चंद्रावर मंगळावर जाण्याचा विचार करणार कधी ?म्हणूनच प्रेमाला व लैंगिक भावनांना समजुन त्यांना योग्य तो न्याय देणाऱ्या बदलाची आज नितांत गरज आहे .यावर आज दुर्लक्ष झाले तर विवाहसंस्था अजुन ढासळेल . व दुःखी व मनोरुग्ण समाजाची निर्मिती होईल .

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नrelationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोट