शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

विभूती आणि अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 00:29 IST

कट्टर धार्मिकनिष्ठ आणि कट्टर विज्ञाननिष्ठ असे दोन विचारप्रवाह आज अस्तित्वात आहेत. जिथे रहस्य तिथे वाद असतातच.

- विजयराज बोधनकरया पृथ्वीतलावर अनंत धर्म, भाषा, संस्कृती, वेशभूषा, परंपरा, रूढी आज अस्तित्वात आहेत. जशी मानसिकता तसे तिथले जगणे असते, जशी जिथली भौतिक साधने, तसे तिथले व्यवहार, प्रथा प्रचलित झालेल्या असतात. कट्टर धार्मिकनिष्ठ आणि कट्टर विज्ञाननिष्ठ असे दोन विचारप्रवाह आज अस्तित्वात आहेत. जिथे रहस्य तिथे वाद असतातच. रहस्यमय प्रश्नाच्या उत्तराला प्रमाण नसले की कल्पकता हीच वास्तवता गृहीत धरली जाते आणि त्याचे पुढे स्तोम माजते. कुणी अनुभूतीचे मार्ग अवलंबतात तर कुणी विभूतीचे म्हणजे चमत्काराचे मार्ग अनुसरतात. या दोन्हीत खूप मोठा फरक आहे. बरेचदा ईश्वरीय सत्य समाज नाकारतो आणि मृगजळ स्वीकारतो.

अध्यात्म म्हणजे धार्मिकता नव्हे आणि धार्मिकता म्हणजे अध्यात्म नव्हे. शिर्डीच्या साईबाबांनी सर्व जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा अध्यात्माचा मोठा महामंत्र दिला, पण त्याचे अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढले. तिथे कर्मकांड जास्त आणि मंत्राच्या खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष होतेय. आयुष्यभर फाटके पण स्वच्छ कपडे घालणाºया साईबाबांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढविला आहे. खरेच हे भक्तीचे प्रतीक आहे की फक्त मूर्तीची सजावट आहे. आपल्या कर्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली तर सबुरीने सर्व काही प्राप्त होते हा मंत्र साईबाबांनी दिला. अडचणी आणि संकटे मानवाच्या कृत्यातून जन्म घेत असतात. ती संकटे त्रास देऊन जाणारीच असतात.

अशा वेळेस माणूस हतबल झाला की त्याला मानसिक आधाराची गरज वाटते. त्या वेळी मात्र धार्मिक स्थळे मनाला खरोखरच आधार देतात. परंतु त्यामुळे संकटाची तीव्रता कमी होते का, हा प्रश्न महत्त्वाचा. आपल्याच कर्मबंधनातून सुख आणि दु:ख निर्माण होत राहतात. गंभीर काळात बुद्धीचा तोल जाणे आणि बुद्धीचा समतोल राखणे हीसुद्धा एक कला आहे. ती ज्याला साध्य झाली तो स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवू लागतो आणि तीच खरी अनुभूती असते. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक