शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

नात्यांचे रेशीम बंध उलगडताना..... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 21:07 IST

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे

माणूस अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत धडपडत असतो. आयुष्य सुखाने जगता यावे तो बऱ्याच गोष्टींशी समझोता करत असतो. कधी आवडी निवडी तर कधी नाती... पण आयुष्य चैनेत जगण्याची स्वप्न उराशी बाळगून घड्याळाशी काट्याची टक्कर देताना तो कुटुंबाली वेळ देण्यास पण काचकुच करतो. मग रक्ताच्या नात्यात देखील समन्वयाचा अभाव जाणवू लागतो. संवादाची जागा वाद घेण्यास सुरुवात करतो. अशावेळी तुम्हांला वेळीच धोक्याचा इशारा समजून घेणे गरजेचे असतात. नाहीतर आयुष्यातला आनंदाचा रंग ऊडून जायला काहीवेळ लागत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.  अनेक वर्षांपासून तुटलेला संवादाचा पूल यामुळे जोडला जात आहे.  रक्ताच्या नात्यांमधील गोडवा पुन्हा वाढीस लागला आहे. विशेषत: गावाकडे अशाप्रकारची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. पाच - दहा वर्षांपासून शिक्षण, नोकरी निमित्ताने पुण्या मुबंईत जाणाऱ्या व्यक्तीला घरातल्या माणसांकडून मायेची ऊब मिळाली आहे. 

कोरोनामुळे सध्या सर्वच शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यामुळे बाहेर गावावरून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या मुलामुलींना पुन्हा गावाकडचा रस्ता धरावा लागला आहे. अशात काहीजण आई वडिलांसोबत भांडण करून शहरात आपले नशीब आजमवण्यासाठी आले होते. पाच सहा वर्षांपासून गावाकडे जाणे झाले नाही. घरच्यांबरोबर अबोला कायम होता. मात्र अचानक लॉकडाऊन झाले आणि समोर गंभीर परिस्थिती उभी राहिली. दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊ लागले. अशावेळी अनेकांनी पुन्हा आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे कित्येक वर्षांनंतर वडील आणि मुलाचा संवाद घडला. अशा घटना दिसून आल्या आहेत. याबाबत अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले आहेत.  लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि कंपनीत काम करणाऱ्यांना घरच्यांनी बोलवून घेतले. ते घरी पोहोचले आहेत. भाव-भाव, वडील मुलगा यांचे पटत नव्हते. मात्र, या संसर्गाच्या भीतीमुळे नात्यातील वाद मिटवून एकत्र आले आहेत. एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. भाऊच नाही तर भावकीतील लोक संपर्कात आले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात नातेवाईकजवळ आले असून, दररोज फोन, व्हिडिओ कॉल करून खुशाली जाणून घेत आहेत. काही लोक लॉकडाऊनमुळे गावी पोहोचू शकले नाही. ते शहरात असल्याने विशेष करून त्यांची काळजी गावाकडील लोक करत आहेत. गरज असेल तेव्हाच घरातून बाहेर निघा. अन्यथा घरातच राहा. घरातून बाहेर पडला तर काळजी घ्या. सोशल डिस्टेन्स पाळण्याचे आवाहन गावातील लोकांकडून करण्यात आहे. शहरात दोन हजारहून अधिक विद्यार्थी अडकले असून. त्यांचीही कुटुंबियांकडून काळजी घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवारcorona virusकोरोना वायरस बातम्या