मुस्लीम देशातही आपलेच मानले जातात प्रभू श्रीराम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 02:18 PM2018-03-25T14:18:16+5:302018-03-25T16:44:16+5:30

प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तीपुजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात.

Prabhu Shriram is considered to be in Muslim countries | मुस्लीम देशातही आपलेच मानले जातात प्रभू श्रीराम

मुस्लीम देशातही आपलेच मानले जातात प्रभू श्रीराम

googlenewsNext

प्रभू श्रीराम म्हटले की ते फक्त हिंदूंचेच. हिंदूंचा देव म्हणजे अन्य धर्मीयांना त्यांच्याशी काहीच घेणे देणे नाही. मूर्तिपूजेच्या विरोधात असणाऱ्या मुसलमानांना तर रामाबद्दल काहीच श्रद्धा असण्याचे कारण नाही. असे एक नाही अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. भारतातील परिस्थिती काही प्रमाणात आहेही तशीच. मात्र हेच जर आपण थोडे सीमेपलीकडे गेलो. त्यातही आग्नेय आशियात डोकावले तर कळते राम हे फक्त आपलेच नाहीत, तर अवघ्या जगाचे आहेत. त्यातही इंडोनेशिया या मुसलमान बहुसंख्येच्या देशातील बाली प्रांतात गेलो तर ते मुसलमानांनाही आपले वाटतात. कारण एकच आपण रामाकडे, रामायणाकडे धार्मिक परंपरा म्हणून पाहतो तर बालीमध्ये राम आणि रामायण हा अभिमानास्पद असा गौरवशाली सांस्कृतिक वारसा आहे.

तुम्ही इंडोनेशियाच्या बालीत एखाद्या मुसलमानाला विचारलत की तुम्ही रामायण का वाचता? तर तुम्हाला झटकन उत्तर येईल, आम्ही आणखी चांगली माणसं बनण्यासाठी रामायण वाचतो. रामायणाचे एवढे चांगले महत्व, रामाचे आदर्श पुरुषोत्तमाचे स्थान अभिव्यक्त करण्यासाठी आणखी काय सांगितले पाहिजे. आपल्याकडे हे मनामनात असतंच पण बालीमध्ये ते हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयही अभिमानाने तसे सांगतात, हे महत्वाचे!

पर्यटक जेव्हा इंडोनेशियात जातात तेव्हा बालीतील अयुंग नदीच्या पात्रात राफ्टिंग करण्यासाठी जातातच जातात. राफ्टिंगचा थर्रार अनुभवतानाच जेव्हा नजर नदीसभोवतालच्या कातळांवर जाते तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो. अन्य नद्यांच्या कडेलाही कातळं असतातच. त्यांच्यात नदीच्या प्रवाहामुळे काही नैसर्गिक कलाकृती आपोआप निर्माण होतात. निसर्गाच्या त्या अनुपम रचना असतात. मात्र बालीतील अयुंग नदीकिनाऱ्यावरील कातळात मानवनिर्मित अप्रतिम शिल्लाकृती आहेत. त्या शिल्पाकृती रामायणातील प्रसंगांवर आधारीत आहेत. रामायण जेथे घडले त्या आपल्या भारतातही रामायणाच्या अशा शिल्पाकृती दिसत नाहीत. मात्र बालीत त्या आहेत. आपोआपच थर्रार अनुभवतानाच मनात एक प्रसन्नता दाटते.

तेथेही रामायण आहे. ''रामायण काकावीन'' या नावाचे. नवव्या शतकातील या रचनेचे लेखक योगीश्वर आहेत. या रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते राम-सीतेचीच कथा सांगत असले तरी स्थानिक भोगौलिक परिस्थिती, सांस्कृतिक वारशाचा समावेश असलेले आहे. एवढेच नव्हे तर इंडोनेशियातील काही नाट्यपथके रामलीलाही सादर करतात. त्या रामलीलेत अवघे रंगून जातात. महाकाव्याचे रंगमंचावरील सादरीकरण इंडोनेशियन शैलीत पाहणे हा एक वेगळा अविस्मरणीय आनंदच असतो. मुळातच रामाची भक्ती करणारे भक्तीरसात असे रंगून जातात की त्यांना आपल्या आराध्यदैवतापलिकडे दुसरे काही दिसत नाही, येथे तर सभोवताली सर्वत्रच राम आणि रामायण दिसते. निसर्गाच्या थर्रारातही!

Web Title: Prabhu Shriram is considered to be in Muslim countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.