शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:56 PM

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे

विजयराज बोधनकरएखादा सुशिक्षित तरुण पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन टिळा, माळा घालून अभंगवाणी म्हणायला लागला, तर हे अज्ञानी जग लगेच त्याला म्हणेल, अजूनही अंधश्रद्धेच्या जगातच वावरतोय वाटतं! त्यानेच टाय, कोट घालून एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून मिटिंगचे फोटो फेसबुकवर टाकले, तर जग लगेच म्हणेल, व्वा प्रगती केली पोराने. तोच तरुण एखाद्या मोठ्या टॉवरमधल्या फ्लॅटमध्ये राहायला गेला तर जग म्हणेल, एकदम टॉवरमध्ये? काही तरी काळंबेरं दिसतंय! आला कुठून इतका पैसा? कुणी सुशिक्षित रिक्षातून फिरताना दिसला तर जग नक्की कपाळावर आठ्या घालून म्हणेल, जमली नाही वाटतं अजून करिअरची गणितं? अजूनही रिक्षानेच फिरतोय? कुणी युरोप, अमेरिकेवरून स्वत:चे फेसबुकवर फोटो आपलोड केले, तर मग त्याची आरती ओवाळून जग नक्की म्हणेल की, फारच मोठी भरारी घेतली बरं का?

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे आणि तो म्हणजे, ‘का रे भुललाशी वरलीया रंगा?’ हे बेभरवशाचं जग वरच्या दिसणाºया आवरणावर भाळत राहतं, पण ते माणसाच्या अंतरंगी कुठला, किती ज्ञानी, सुसंस्कृत आहे याचा अभ्यास न करता वरवर दिसणाºया मृगजळाकडे बघून बोलत सुटतं. अशा उथळ बोलण्यावर, प्रशंसेवर, चेष्टा करण्यावर जो विचार करीत बसतो तो मानसिकदृष्ट्या खचतच जातो. असे समजावे हे बहुरूपी जग अजून त्याला उमजलेच नाही. इथे महत्त्वाचे हे आहे की, चंचल जगाचा विचार करून जगण्यापेक्षा बुद्धिमतेचा, आनंदाचा विचार करून आयुष्याचा प्रवास करणारा उज्ज्वल आयुष्य जगू शकतो, भ्रम निर्माण करणाºयाकडे, दु:खाकडे, सुखाकडे जो पाठ फिरवेल, त्याकडे सदैव आनंदाच्या उत्तरांचीच गंगाजळी असेल. या कृत्रिम जगापासून आणि उथळ समाजापासून जो मुक्त राहील, तोच अध्यात्माचा, आनंदाचा, यशाचा वारकरी होत जाईल. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरAdhyatmikआध्यात्मिक