शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महाराष्ट्राचा लोकदेव; पंढरपूरचा विठोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:27 AM

पंढरपूर हे महाराष्ट्राचे धर्महृदय आहे आणि तेथे नांदणारा श्री विठ्ठल हा मराठी संतांचा प्रियतम देव आहे.  

डॉ. रामचंद्र देखणे - (प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) 

सकल संतांनी आपला श्रद्धाभाव विठ्ठलाच्या ठायी समर्पित केला आहे. महाराष्ट्राचा लोकदेव पंढरपूरचा विठोबा हा आहे. धर्म, पंथ, संप्रदायाच्या चौकटी बाजूला सारून अद्वैताच्या भूमिकेवरून या लोकदेवतेला स्वीकारले आणि आपल्या अभंगवाणीतून शब्दवैभवाने तिला सारस्वतामध्ये मिरवले. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, ‘आनंद, अद्वय, नित्य निरामय । जे का निजध्येय योगियांचे । ।’’ आनंदरूप, नित्य, निरुपाधिक, शुद्ध आणि योगीही ज्यांचे ध्यान करतात तेच सावळे सुंदर रूप भीमातीरी विठ्ठलरूपात उभे आहे आणि हेच विठ्ठलाचे श्रुतिसिद्ध लक्षण आहे. पंढरीचा विठ्ठल हे साक्षात परब्रह्म. ब्रह्म म्हणजे बृहत्तम होणे. व्यापक होणे. ब्रह्म म्हणजेच विश्वकल्याणाचा विचार आणि आचार, जशी ज्ञानभक्तीच्या समचरणावर ही सावळी विठ्ठलमूर्ती उभी आहे तसेच सविचार आणि सआचाराच्या समचरणावर कल्याणाचे मूर्तिमंत रूप पंढरपुरी साकारले आहे. साने गुरुजी म्हणायचे, ‘पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्रीय जनसंघटनेचा मुका अध्यक्ष. येथे सर्वांनी यायचे, भेटायचे, आपले दु:ख देवाला सांगायचे.’    ‘‘जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा देवा सांगू सुखदु:ख । देव निवारील भूक घालू देवासीच भार ।’’  देव सुखाचा सागर आपली दु:खे दुसऱ्याजवळ उगाळीत बसण्यापेक्षा विठ्ठलाच्या रूपात जी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ दु:ख सांगावे आणि सुखरूप व्हावे. दु:ख विसरून हसरे व्हावे यात केवढी प्रासादिक भावना आहे. पंढरपूरचे वाळवंट म्हणजे भक्तप्रधान समतेचे प्रभावी व्यासपीठ आणि पांडुरंग म्हणजे त्या व्यासपीठाचा अध्यक्ष. ह्या अध्यक्षाला कसे पाहावे? द्रष्टा, दृश्य व दर्शन या त्रिपुटीरहित पाहावे म्हणजे त्यात आत्मतत्त्व दिसू लागेल, ते आत्मतत्त्व विठ्ठलाच्या रूपात पाहायला मिळते. मन तृप्त होते आणि वृत्ती त्याच्या ठायी स्थिरावते, पंढरपूर हे महाराष्ट्राचे धर्महृदय आहे आणि तेथे नांदणारा श्री विठ्ठल हा मराठी संतांचा प्रियतम देव आहे.  ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे की, ज्या मराठी संतांनी पांडुरंगाच्या गुणरूपाचे गायन उत्कट शब्दांत केले आहे, त्यांच्या भावदृष्टीत त्याच्या रूपाचा ‘कोटी चंद्रप्रकाश’ फाकलेला आहे. निळ्या नभाला लाजविणारे त्याचे गूढ निळेपण त्यांच्या दृष्टीचे लेणे बनले आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर