‘‘पार्था, ज्या परमभक्ताचे स्थिर मन फक्त माझ्यातच गुंतलेले आहे, जो परमभक्त सतत माझेच नाम घेत माझ्यातच आसक्त झालेला आहे अशा माझ्या परमप्रिय भक्ताला माझी वेगळी आठवण काढावी लागत नाही. ...
बुद्धी हे असं एक कपाट आहे ज्यात माणूस आपले अनंत विचार, आठवणी, घडून गेलेल्या घटनांचे तपशील, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, कथा, व्यथा, नवकल्पना, मित्रांनी, गुरूजनांनी, मातापित्यांनी दिलेले मौलिक सल्ले अशा अनेक गोष्टी मेंदू आपल्या कप्प्यात साठवून ठेवतो ...