Education and Sanskar! | शिक्षण आणि संस्कार!
शिक्षण आणि संस्कार!

 शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे. या दोन संपत्तीशिवाय मालमत्ता, जमीनजुमला, पद-प्रतिष्ठा आणि मान-मर्यादा सर्व तुच्छ आहेत. शिक्षण केवळ व्यक्तीच्या आयुष्यासाठी दिशानिर्देशच करीत नाही तर स्थिती देखील बदलते. अनादी काळापासून म्हणजे जेव्हा शिक्षणातून मिळणाºया ज्ञानाला संग्रहीत करण्याचे काहीच साधन नव्हते तेव्हा हे शिक्षणरूपी ज्ञान ऋषी, मुनी, आचार्य, गुरू आणि संत महात्म्यांनी मानवी जीवनाचे सार वृक्षांच्या साली, दगडी शिला आणि पानावर लिहिले होते. आणि हेच ज्ञान त्यानंतर विस्तारीत झाले त्याचा प्रसार-प्रसार होत गेला आणि हळुहळू शिक्षण आणि शोध, शिक्षण उद्देश, पध्दती स्वरूपात आणि शैक्षणिक दर्जामध्ये वारंवार बदल होत गेला. आज वेळ आली आहे की, जर जग, देश, समाज आणि कुटुंबातील प्रत्येक कुटुंब शिक्षित नसेल तर मग आम्ही प्रगत जग किंवा प्रगत देशाची कल्पनाच करू शकत काळ नाही. त्यामुळे आज फार वेगाने बदलत आहे आणि नवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. शिक्षणाची नवनवीन साधने विकसीत आणि आविष्कृत होत आहे. जग जवळ येत चाललेल आहे. एखाद्या छोट्या घटनेचा सुध्दा प्रभाव संपुर्ण जगावर आज पडत आहे आणि हा प्रभाव समजण्यासाठी, तंत्रज्ञानाचा समज घेण्यासाठी, आपल्या मुलांना उत्तम शिक्षण, अर्थपुर्ण शिक्षण आणि व्यावहारीक शिक्षणासह काळाच्या सोबत चालणे खुप महत्वाचे आहे. ज्या प्रकारे विना शस्त्र युध्द केले जावू शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षणाशिवाय जीवन सार्थक आणि सत्य बनवू शकत नाही. आपण सर्वांचे आद्य आणि सर्वोत्तम कर्तव्य हेच आहे की, आपल्या संततीला सुशिक्षित व सुसंस्कारीत बनविणे कारण सुशिक्षित व सुसंस्कारीत परिवार - समाज आणि देशाच्या विकासामध्ये खुप महत्वाची भूमिका पार पाडू शकेल आणि देशाचा एक जबाबदार नागरीक बनुन त्यांचे कर्तव्य व जबाबदारी यातून समाजाचा व देशाचा विकास करू शकेल.
शिक्षणामध्ये संस्कार समाविष्ट आहे. कारण भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय जीवन मुल्य हे शिक्षणाचा आधार आहे. सनातन धर्म हेच शिकवीत आलेला आहे की मनुष्यामनुष्यामध्ये प्रेम, बंधुता, एकता, सहकार्य आणि एकमेकांच्या सुखदु:खात सहकार्य करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचा हेच वैशिष्ट्य आहे की सर्व संस्कृती त्यात सामावलेल्या आहेत आणि त्याने त्याचे अस्तित्व सुध्दा टिकवून ठेवले आहे. संस्कार कोणत्याही झाडावर उगवत नाही, आकाशातून पडत नाही, संस्कार घर, परिवार, समाज आणि सभोवतालच्या वातावरणापासून सुजीत होत असतात. संस्काराची सगळ्यात जास्त जबाबदारी आई-वडील, पालक आणि शिक्षकांची असते. हे देखील तेवढेच खरे आहे की ही संस्कार केवळ सांगण्याव्दारे, बोलण्याव्दारे येत नाही, पण ते वर्तनातून-आचरणातून येतात, सत्कर्मातून येतात आणि चारित्रीक उज्वलतेतून येतात. जसे आई-वडील, पालक वागतात तसेच त्यांची मुलं पण आचरण करतात.

- सविता लिलाधर तायडे
 


Web Title: Education and Sanskar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.