शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दिसते तसे नसते!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 9:37 PM

एका बाईला नेहमी वाटायचे, की समोरच्या फ्लॅटमधील स्त्रीचा पती पत्नीची खूप काळजी घेणारा आहे....

- डॉ.दत्ता कोहिनकर - दामले मॅडमचा ५०वा वाढदिवस. आयुष्याभर नि:स्वार्थपणे, सेवाभावी वृत्तीने अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले होते. बंगल्यावर त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो असता, त्यांनी विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्याच्या स्वभावाची व नैतिक मूल्यांची खूप वाहवा केली व बौद्धिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असल्याने तो आयुष्यात काहीतरी चांगले कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला व एकाला लांबूनच दाखवून त्याबद्दल व्यसनी व वाया गेलेली केस, असा शेरा मारला . त्या वेळेस मी चिंतन करताना मला अमेरिकेच्या ३२व्या अध्यक्षाची अर्थात फ्रेंकलिन रुझवेल्ट यांची आठवण झाली. जो वाईट राजकारणी, गुंड यांच्या संपर्कात असायचा, दररोज सिगारेट व दारू प्यायचा व ज्योतिष्यांचा वारंवार सल्ला घ्यायचा. एकंदरीत, मवाली प्रतिमा. त्याला दोन बायका होत्या; परंतु उच्च पदावर त्याने महत्तम कार्य करून दाखविले. इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल कॉलेजमध्ये अफीम वापरायचा, दररोज खूप प्यायचा, अहंकारी होता, त्याने पंतप्रधानपद भूषवून महत्त्वपूर्ण काम केले व जो संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, बायकोशी प्रमाणिक, उत्कृष्ट चित्रकार, कष्टाला प्रधान्य देणारा अ‍ॅडॉल्फ हिटलर ज्याने लाखो ज्यू लोकांची कठोर पद्धतीने हत्या केली. या चिंतनानंतर लोकांच्या दर्शनी भागावरून, सवयीवरून त्यांच्याबद्दल अनुमान काढण्याचा फोलपणा मला लक्षात आला व समजले- तुम्ही कोणालाच पूर्णत: ओळखू शकत नाही. खरोखर मित्रांनो, प्रत्येक जण हा आपापल्या बुद्धीनुसार, आलेल्या अनुभवानुसार, परिस्थितीनुसार, कुवतीनुसार समोरच्यांना पाहत असतो; पण ते अंतिम सत्य असतेच असे नाही. एका बाईला नेहमी वाटायचे, की समोरच्या फ्लॅटमधील स्त्रीचा पती पत्नीची खूप काळजी घेणारा आहे. कारण तिने २ वेळा त्याला कारबाहेर उतरून पत्नीचा दरवाजा उघडताना पाहिले होते. नंतर एका मैत्रिणीने सांगितले, की त्याच्या कारच्या दरवाजात बिघाड झाला आहे, तो आतून उघडत नाही. एक बाई समोरच्या मैदानावर तीन मुलांना खेळताना पाहून विचार करत दु:खी झाली. कारण तिला एकच मुलगा होता. कालांतराने तिला कळले, की त्या घरातल्या तीन मुलांपैकी दोन मुले ही त्या कुटुंबाने दत्तक घेतली असून त्यांचा स्वत:चा एक मुलगा हा कॅन्सरग्रस्त आहे. मित्रांनो, तुम्ही काय बघता, काय अनुमान काढता, काय विचार करता यापेक्षा सत्य परिस्थिती काही वेगळीच असते. त्यामुळे कुणालाही कमीजास्त लेखू नका. प्रत्येक माणूस हा देवाची निर्मिती आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करा. प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून समोरच्या व्यक्तीला पाहत असतो. प्रत्येक जण खत:ला आलेल्या अनुभवातून दुसऱ्याविषयी अंदाज बांधत असतो. प्रत्येकाचा माईंडसेट वेगळा असतो. त्यामुळे समोरच्याला ओळखण्यात चूक होऊ शकते. आणि प्रत्येक माणसाला आपल्याबद्दलची माहीती त्याला स्वत:लाच माहीत असते. मनुष्य चांगल्या गोष्टी बाहेर शेअर करतो; पण बरेचसे तो झाकून ठेवत असतो. म्हणून कोणीही कोणाला पूर्ण ओळखू शकत नाही. एखाद्याची भारदस्त कार आपण पाहतो; पण त्याच्यावर असलेले कर्ज आपणास दिसत नाही. म्हणून एखाद्याच्या बाह्यरूपावर जाऊन निर्णय घेऊ नका.    (लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपMeditationसाधना