संघर्षमय जीवनात मनशांती गरजेचे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 06:53 PM2019-03-15T18:53:16+5:302019-03-15T18:57:23+5:30

आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी ...

Manashanti needs conflict in life ...! | संघर्षमय जीवनात मनशांती गरजेचे...!

संघर्षमय जीवनात मनशांती गरजेचे...!

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यात्म - अधि आत्म- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच स्वतकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येतेअध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग

आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाºया चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो.

अध्यात्म - अधि आत्म- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच स्वतकडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते. त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय, याचा विचार सुरू होतो आणि मग एक पूर्णत्वाची आस निर्माण होते. आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा, त्यातल्या अनेक ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याची जाणीव निर्माण होते. आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय, हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता.

अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव, अशी शक्ती किंवा असे कोणीतरी असते हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते.

याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात. अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी स्व:चा शोध घेतला जातो.
- शिवदास कंटीकर महास्वामी, शेळगी, सोलापूर

Web Title: Manashanti needs conflict in life ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.