शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

मन: शांती - मनवा.. पोपटपंची सब व्यर्थ है....! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 9:27 PM

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय....

- डॉ. दत्ता कोहिनकर- रविवारचा दिवस, सुट्टी असल्यामुळे निवांत सोफ्यावर पेपर वाचत बसलो होतो. तेवढ्यात राजाभाऊचा फोन आला. तो म्हणाला अरण्येश्?वर मंदिराच्या सभागृहात माझे गुरू दीनानाथ महाराजांचे प्रवचन आहे. अर्धा त्यास ते ज्ञानेश्वरीवर निरूपण करणार आहेत. त्यानंतर भक्तदर्शन व प्रसादग्रहण असा कार्यक्रम आहे. त्यानंतर तुम्हाला व त्यांना माज्या घरी न्यायची माझी तीव्र इच्छा आहे. तरी आपण आवरून तयार रहा. मी आपल्याला न्यावयास येतो अशी विनंती राजाभाऊंनी केली. तासाभरातच राजाभाऊ कार घेऊन मला न्यायला आला व आम्ही दोघेही महाराजांच्या प्रवचनस्थळी पोहचलो. महाराज ज्ञानेशवरीवर प्रवचन देते होते. जे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत (प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा अंश आहे, तो ईश्वरच आहे.) यावर महाराजांनी अर्धा तास खूप सुंदर विवेचन केले. प्रवचन संपल्यावर भक्तमंडळींची तुडूंब गर्दी , साष्टांग दंडवत व आशीर्वद प्रदान -प्रसाद ग्रहण कार्यक्रम संपल्यावर महाराज राजाभाऊंच्या गाडीत बसले. गाडीत महाराजांचा जप(नामस्मरण) जोरात चालू होता. नेमके मित्रमंडळ चौकात एका तरूणाने राजाभाऊच्या गाडीला डॅश मारला व तो राजाभाऊलाच शिवीगाळ करू लागला. मी दोघांना समजवण्याच्या प्रयत्नात असतानाच महाराज पुढे आले व त्यांनी त्या तरूणाला मला ओळखतो का नायक?  हजारो लोक माज्या पाया पडतात असे म्हणत महाराजांनी त्या तरूणाला धक्काबुक्की केली. मी महाराजांना हात जोडून गाडीत बसवले व समजोता करून पुन्हा राजाभाऊंनी गाडी सुरू केली. राजाभाऊंच्या घरी महाराजांचे स्वागत जोरात झाले. माज्या मनात एकच विचार जोरात घोळत होता. ह्यह्यजे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत प्रत्येक प्राण्यात देवच आहे हे अर्धा तास लोकांना समजावून सांगणारे महाराज वेळ आल्यानंतर समोरच्या माणसातील देवत्व का नाही पाहू शकले ? त्यावेळी आचार्य ओशोंच्या प्रवचनातील एक गोष्ट मला लगेच आठवली. एका राजाकडे एक संन्यासी येतो. एकाच वेळी हजारो लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर ह्यअध्यात्मह्ण समजावून सांगण्यात त्याची खूप किर्ती पसरलेली असते. एकदा तो राजाच्या राजमहालावर येतो. राजा आपल्या अलिशान बेडवर निवांत बसलेला असतो. दासी त्याला वारा घालत त्यांची सेवा करत असते. राजाला तो संन्यासी सर्वस्वाचा त्याग करून अध्यात्ममार्गात प्रवेश करण्याचा सल्ला देतो. राजा, त्या संन्याशाला आपल्या राजवाडयातच ऐश्वर्यसंपन्न खोली राहावयास देतो. दुसºया दिवशी संन्यासी राजवाड्यासमोरच असलेल्या पिंपळाच्या पारावर जप करत बसलेला राजाला दिसतो. राजा आपल्या लोकांना चारही बाजूने राजमहाल पेटवण्यास सांगतो. राजमहाल पेटताच संन्याशाचे लक्ष पेटत्या राजमहालाकडे जाते, तो पळत राजाजवळ येऊ म्हणतो, महाराज हे काय केले  ?  महाराज संन्याशाला म्हणाले, तुम्ही तर सांगितले ना, सर्वस्वाचा त्याग करायला - म्हणून मी महालच पेटवून दिला. आगीचे उसळलेले डोम पाहून संन्यासी जोरात ओरडला. महाराज थांबा-थांबा. माझी लंगोट आतील रूममध्येच राहिलीय व तो पळत राजवाड्यात शिरला. राजाला सर्वस्वाचा त्याग करावयास सांगणारा व हजारो लोकांना प्रवचन देणारा संन्यासी मात्र आपला लंगोट सोडू शकत नव्हता. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय. खरोखर मित्रांनो प्रॅक्टीकल आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे. एक का होईना सदविचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करू या .?? पोपटपंची सब व्यर्थ है... .

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधना