शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

मन:शांती -  नैतिक मर्यादांचे पालन.. आनंदाला उधाण..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 21:28 IST

मनावर संयम ठेवून नैतिक मूल्यांची जोड देऊन सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर जीवन सुखी व समृद्ध होते.

चौदा वर्षांच्या रमेशला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. वडिलांनी मोबार्इ$ल हिसकावून अभ्यास करावयास सांगितले, तर रागाच्या भरात रमेशने आत्महत्या केली. पुण्यात नुकत्याच घडलेल्याया घटनेवर खूप गंभीर विचारमंथनाची गरज आहे. प्रतिभा ही कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतलेली विवाहित तरुणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यांसारख्या मुक्त वातावरणात वाढलेली. तिने हाफ स्लिव्हचा टी-शर्ट घातलेला, स्वत:चा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंट्स वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच चढला. तुफान भांडणे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ... आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे. ऐश्वर्यसंपन्न कुटुंबातील प्रत्येकाला बंगल्यात स्वतंत्र खोली. टुमदार बंगला टोपेसाहेबांनी बांधला खरा, परंतु एकुलत्या एका मुलाला त्याच्या बेडरूममध्ये इंटरनेटवर तो काय पाहतोय, याकडे आई-बाबांचे दुर्लक्ष. विशाल नेटवर अश्लील साईट्स पाहता पाहता घरात पैशांची चोरी करीत वाममार्गाला लागला. विविध आजारही ओढवून घेतले. यातून खचल्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत. नैराश्याने पछाडलेली मेधा ध्यानवर्गासाठी आली होती. दिवसभर पती आॅफिसला गेले, की घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. चॅटिंग करता करता तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा तिच्यात फार गुंतला, हे कळल्यावर मेधाच्या पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. मेधा आज नैराश्याने ग्रासली आहे. आत्महत्येचे विचार तिला सतावतात. मोबाईल, इंटरनेट या खऱ्या गरजेच्या व उपयुक्त अशा गोष्टी. यामुळे ज्ञानवृद्धी, जवळीक, प्रसिद्धी, व्यवसायवृद्धी, वेळेची बचत, जलद संवाद, ओळखी यांसारख्या अनेक गोष्टी साधल्यामुळे जीवन सुखी व समृद्ध होते. मनावर संयम ठेवून नैतिक मूल्यांची जोड देऊन यांचा योग्य वापर केला तर तुम्हाला खूप मदत मिळते, पण मर्यादा न पाळता सीमारेषा ओलांडली तर मात्र आयुष्य कष्टमय व दु:खमय होण्याची दाट शक्यता असते. बंगळुरू हे आयटी पार्क शहर. या शहरात मागील वर्षी इंटरनेट व मोबाईलच्या अति व असुरक्षित वापरामुळे ४,१९२ घटस्फोटांचे दावे न्यायालयात दाखल झाले आहेत. केरळमध्ये तज्ज्ञांच्या मते २५ टक्के घटस्फोटांचे दावे हे आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींचे आहेत. भारत हा फेसबुकच्या वापरात दुसºया क्रमांकावर असून १२५ कोटी लोक याचा वापर करीत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आहेत. आज तरुण पिढीने नेटचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करताना मनावर बंधने घालून वेळेचे भान ठेवावे. चॅटिंग करताना सावधानता बाळगावी, पालकांनी आवश्यक त्या साईट्स ओपन ठेवून बाकी घातक अशा साईट्स ब्लॉक कराव्यात. मुले नेट वापरताना दूरून लक्ष ठेवावे.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाMeditationसाधना