Govatsa Dwadashi 2020: How to celebrate govatsa dwadashi if you do not have cow calf at home | Govatsa Dwadashi 2020: घरात गाय किंवा वासरू नसताना आज कशी साजरी कराल वसु बारस?; वाचा फक्त एका क्लिकवर

Govatsa Dwadashi 2020: घरात गाय किंवा वासरू नसताना आज कशी साजरी कराल वसु बारस?; वाचा फक्त एका क्लिकवर

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसू बारस (Vasu Baras). या दिवशी गाय-वासरांची पूजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केला जातो.  दिवाळीला आजपासून सुरुवात होत असल्याने  मोठ्या आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह आणि लगबग बघायला मिळते. वसू बारस या दिवशी बहुतेक स्त्रियांचा उपवास असतो. वसू बारसेच्या दिवशी गहू, मूग यांचे सेवन न करता बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाण्याची पौराणिक प्रथा आहे.

गाय आणि वासरू यांच्या नात्यातून जो प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांना उत्तम आरोग्य आणि सुख मिळावे, अशी वसूबारस पुजेमागील अख्यायिका आहे. भारतात घरातील दूध दुभत्या जनावरांची पूजा करण्याची प्रथा आहे.  मुंबई, पुण्यात किंवा ग्रामीण भागातही आज अनेक ठिकाणी घरांमध्ये गाय-वारसं नाहीत. त्यांना हा गोवत्स द्वादशी  किंवा वसूबारसेच दिवस कसा साजरा कसा करायचा? असा प्रश्न  पडला असेल तर आज आम्ही  हा सण कसा साजरा करता येईल याबाबत सांगणार आहोत. 

गाय नसताना 'असे' करा पुजन

वसू बारसच्या दिवशी तुमच्या कडे गाय नसेल तर पाटावर गायीचं चित्र काढून किंवा तांदळाने गाय साकारून देखील वसू बारसेच्या संध्याकाळी तिची पूजा करा. यादिवशी काही जण दिवशी दिवसभर उपवास करतात. तसेच दिवसभर दूध -दूधाचे पदार्थ टाळले जातात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय रहात नाही. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.

Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे दिवाळीप्रमाणेच सगळेच सण शांतातपूर्ण आणि गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन केलं आहे. कारण पुन्हा गर्दी करून सण उत्सव साजरे केल्यास कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते. म्हणून तज्ज्ञांनी सर्तकतेचा इशारा दिला आहे. म्हणून घरच्याघरी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सण उत्सव साजरे करायला हवेत. 

Diwali 2020 : दिवाळीची साफसफाई करताना 'या' टिप्स वापराल; तर कमी वेळात घर होईल चकाचक! 

Web Title: Govatsa Dwadashi 2020: How to celebrate govatsa dwadashi if you do not have cow calf at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.