Dhanteras 2018: धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करुन नका 'या' वस्तू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 11:10 IST2018-11-05T11:09:55+5:302018-11-05T11:10:15+5:30
Dhantrayodashi 2018: आज धनत्रयोदशी साजरी केली जाणार असून या दिवशी खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. श्रीमंत असो वा गरीब या दिवशी खरेदी आवर्जून करतात.

Dhanteras 2018: धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करुन नका 'या' वस्तू!
(Image Credit : AmarUjala)
आज धनत्रयोदशी साजरी केली जाणार असून या दिवशी खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. श्रीमंत असो वा गरीब या दिवशी खरेदी आवर्जून करतात. कारण या दिवशी खरेदी केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. अशीही मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि भांडी खरेदी केल्यास अधिक समृद्धी लाभते.
पण या दिवशी काय खरेदी करावं आणि काय खरेदी करु नये याच्याही काही मान्यता आहे. मान्यतांनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी खालील काही वस्तूंची खरेदी करु नये.
लोखंडाच्या वस्तू
अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून तयार कोणताही वस्तू घरी आणू नये. जर तुम्हाला लोखंडाची भांडी खरेदी करायची असेल तर दुसऱ्या दिवशी करावी, असे सांगितले जाते.
स्टील
धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची प्रथा फार पूर्वीपासून सुरु आहे. स्टील हे लोखंडाचंच दुसरं रुप आहे. त्यामुळे या दिवशी स्टीलची भांडी खरेदी करु नये असे मानले जाते.
काळ्या रंगाच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू घरी आणणे टाळले पाहिजे, अशी मान्यता आहे. कारण धनत्रयोदशी हा एक शुभ दिवस आहे आणि काळ्या रंगाला नेहमी नकारात्मक मानलं गेलं आहे.
धारदार शस्त्र
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर निघाले असाल तर चाकू, कात्री आणि इतर कोणत्याही धारदार वस्तू खरेदी करु नये.
कार
अनेकदा धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकजण कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करतात. पण मान्यतांनुसार, जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी कार घरी आणायचीच असेल तर त्याची रक्कम एक दिवस आधी जमा करावी.
तेल
धनत्रयोदशीच्या दिवशी तेल उत्पादने जसे की, तेल, तूप रिफाइंड इत्यादी घरी आणू नये. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावण्यासाठी तेलाची गरज पडते, पण हे तेल एक दिवस आधीच घेऊन ठेवावं, असं सांगितलं जातं.
काचेपासून तयार वस्तू
काचाचा संबंध राहुशी जोडला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काचेपासून तयार वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे. तसेच या दिवशी काचेच्या वस्तूंचा वापरही करुन नये अशी मान्यता आहे.