कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला

By नंदकिशोर नारे | Published: November 15, 2022 12:38 PM2022-11-15T12:38:49+5:302022-11-15T12:46:43+5:30

पंजाची आगळी-वेगळी हेअर स्टाईल ठरली आकर्षण; भारत जोडो पदयात्रेत सहभागी

The youth of Kolhapur left for Kashmir on a bicycle and reached Washim in bharat jodo yatra | कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला

कोल्हापूरचा युवक सायकलने निघाला कश्मीरला, वाशिममध्ये पोहोचला

Next

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात दाखल झाली. यावेळी भारत जोडोच्या घोषणा देण्यात आल्यात. राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो नागरिक पदयात्रेत दाखल झाले होते. दूरदूरवरुन नागरिक यात्रेत दाखल झाले आहेत. कोल्हापूरचा नितीन गणपत नागनूरकर हा व्यक्ती राहुल गांधीच्या भारत जोडो पदयात्रेत कोल्हापूरपासून सहभागी झाला आहे. तो सायकलने या यात्रेत शेवटपर्यंत कायम राहणार आहे. अर्थात काश्मीरपर्यंत तो सोबत जाणार असल्याचे त्याने सांगितले.

राहुल गांधीच्या गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला सर्वत्र उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभत आहे.  सर्व स्तरातील, विविध वर्गातील, विविध वयोगटातील लोक या यात्रेत सहभागी होत आहेत. यात कोल्हापूर येथील नितीन गणपत नागनूरकर हा व्यक्तीही सहभागी झाला आहे. त्याने अंगावर कॉंग्रेसच्या झेंड्याशी साधर्म्य असलेला पोषाख परिधान केला असून, डोक्यावर केशकर्तनातून कॉंग्रेसचे  चिन्हं तयार करून घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात होते.

Web Title: The youth of Kolhapur left for Kashmir on a bicycle and reached Washim in bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.