तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:40 PM2018-11-09T22:40:16+5:302018-11-09T22:40:41+5:30

शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.

Tivarang villagers performed the road from the labor | तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

Next
ठळक मुद्देगाव करी, ते राव ना करी : शासनाची वाट न बघता श्रमदान, श्रमदानासोबतच हरिकीर्तन

दिनेश चौतमल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुळावा : शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तळणी व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग गावाला जोडणारा रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांना ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेत लोकसभागातून पुलाची दुरुस्ती व रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली. तिवरंग, मनुला, तळणी, वाकी येथील ग्रामस्थानी होकार देताच कामाला सुरूवात झाली. सध्या पुलाची दुरुस्ती व माती भरावाचे काम पूर्ण झाले. त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. यासोबतच रात्री हरिकीर्तन आयोजित केले आहे. संत मंडळी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत आहे. हभप देविदास महाराज, खंडू महाराज, शिंदे माऊली, गणेश महाराज वाकीकर यांचे कीर्तन झाले. हभप गुलाबराव धोंगडे, प्रकाशराव कदम, विश्वनाथ कदम, जगदेवराव महाराज, नामदेव सूर्यवंशी, अनिल कदमल, बाळू महाराज, रमेश महाजन यांनीही कीर्तन केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव कदम, मारोतराव लोखंडे, विवेक देशमुख यांनी या कामाला भेट दिली. मराठवाड्यातील तळणी रोडला जोडणारा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता आता जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही सुरूवात झाली. मराठवाड्यातील तळणी, वाकी, साप्ती, कोहळी, निघा, कोळी, निवळा, रुचेगाव, भरडगा, नेवरी या गाातील लोकांना विदर्भातील मुळावा येथे येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच विदर्भातील तिवरंग, झाडगाव, पिंपळदरी, मुळावा, हातला, धनज, मोहदरी, पिंपळदरी, सुकळी, करमुला, पोफाळी, तरोडा या गावांची मोठी बाजारपेठ असणाºया नांदेड येथे जाण्यासाठी आता सोयीचे झाले आहे.
४० किलोमीटरचा फेरा वाचला
तिवरंग, मुळावा, उमरखेडमार्गे नांदेड ११० किलोमीटर अंतर जावे लागते. नवीन रस्त्यावरून तिवरंग, तळणी, कोळी, मार्लेगाव मार्गे केवळ ७० किलोमीटर अंतर असल्याने गावकऱ्याचा ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी रस्त्याच्या कामाचे ठिकाणी मुक् कामच ठोकला आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा त्यांचा मनोदय आहे. श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले असून परिसरातील गावांमध्ये ग्राम स्वच्छताही केली जात आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Web Title: Tivarang villagers performed the road from the labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.