दिग्रस येथे शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:00 AM2018-02-21T00:00:22+5:302018-02-21T00:00:58+5:30

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले.

Shiv Jayanti excitement at Digras | दिग्रस येथे शिवजयंती उत्साहात

दिग्रस येथे शिवजयंती उत्साहात

Next
ठळक मुद्देभव्य शोभायात्रा : मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले

ऑनलाईन लोकमत
दिग्रस : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले. तरुणांनी सकाळी मोटरसायकल रॅली काढून शिवरायांचा जयजयकार केला.
दिग्रस येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या विविध भागाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या रॅलीत विविध थोर संतांचे देखावे साकारण्यात आले. शिवरायांची वेशभूषा केलेले तरूण सर्वांचे लक्ष वेधत होते. सकाळी ९ वाजता तरुणांनी शहरातून हातात भगवे झेंडे घेऊन मोटरसायकल रॅली काढली. या उत्सवात माजी राज्यमंत्री संजय देशमुख, सुधीर देशमुख, महादेव सुपारे, राहुल शिंदे, रवींद्र अरगडे, अ‍ॅड. रवींद्र गावंडे, अफजल खान, अरविंद गादेवार, मो. मुजफ्फर, जावेद पटेल, अ. सईद, मजहर खान, अ‍ॅड. नरेश इंगोले, सुनील लबडे, प्रा.पी.एम.दिवे, अशोक तायडे, राजू ठाकरे, अंकुश घाडगे, चंद्रशेखर ठाकरे, प्रवीण गावंडे, दुर्गादास गायकवाड, गिरीश साबळे, ओंकार ठाकरे, भीमराव खारोडे, प्रदीप चोपडे, दिलीप जवादे, राम वाकोडे आदी सहभागी झाले होते.
शिवजयंतीचे औचित्य साधून तीन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. नामदेव जाधव यांनी ‘नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या विषयावर व्याख्यान दिले तर प्रा. आर.एस. यादव यांनी ‘तुकोबा-शिवबा ते ज्योतिबा’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी विजय बंग, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर, साहेबराव पाटील, विजय घाटे, प्रा.डॉ.अपर्णा पाटील आदी उपस्थित होते. येथील शिवजयंती महोत्सवात एकतेचे दर्शन झाले. या महोत्सवात शिवज्ञा संघटना, आदिवासी विकास परिषद, महात्मा फुले सांस्कृतिक मंडळ, मुस्लीम शिवजयंती उत्सव समिती, संताजी ब्रिगेड, अण्णाभाऊ साठे उत्सव समिती, भावसार, चर्मकार, नाभिक, लिंगायत समाज संघटनांसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सहभागी झाले होते.

Web Title: Shiv Jayanti excitement at Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.