रस्त्याअभावी श्रीरामपूरवासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:26 PM2017-11-22T23:26:44+5:302017-11-22T23:27:14+5:30

गाव तेथे रस्ता, हे शासनाचे बीद्र आहे. सर्व लहानसहान गावे, पोड, तांडा वस्त्या रस्त्याने जोडण्याची शासनाची योजना असताना तालुक्यातील १०० टक्के कोलामांची वस्ती असलेले आदिवासीबहुल ....

Road to Shrirampur residents due to lack of roads | रस्त्याअभावी श्रीरामपूरवासीयांचे हाल

रस्त्याअभावी श्रीरामपूरवासीयांचे हाल

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : शासनाच्या उद्देशाला हरताळ, महसूल प्रशासन हतबल

ऑनलाईन लोकमत 
मारेगाव : गाव तेथे रस्ता, हे शासनाचे बीद्र आहे. सर्व लहानसहान गावे, पोड, तांडा वस्त्या रस्त्याने जोडण्याची शासनाची योजना असताना तालुक्यातील १०० टक्के कोलामांची वस्ती असलेले आदिवासीबहुल श्रीरामपूर या महसुली गावाला हक्काचा रस्ता देण्यास महसूल प्रशासन हतबल ठरला आहे.
तालुक्यातील कुंभा महसूल मंडळाअंतर्गत रामपूर लघुसिंचन तलावालगत गावठाणावर कुंभा गावात समाविष्ठ असणारे रामपूरनामक कोलाम पोड वसलेले आहे. या पोडाला १९९४ साली स्वतंत्र महसूली गावाचा दर्जा मिळावा व या गावाचा समावेश इंदिराग्राम ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. या ३०० लोकवस्तीच्या गावाला पूर्वी सरळ रस्ता होता, असे वयोवृद्ध गावकरी सांगतात. पण सदर रस्ता आज गाव नकाशावरूनच बेपत्ता झाला आहे. १९७०-७१ साली रामपूर लघुसिंचन तलाव बांधण्यासाठी पाटबंधारे विभागाने अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर तलावाच्या भिंतीच्या बाजूने संंबंधित विभागाने बांधलेल्या रस्त्याने जवळचा रस्ता म्हणून येथील नागरिकांनी जाणे-येणे सुरू केले व तोच रस्ता वहिवाटीचा ठरला. आज त्याच रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने केवळ बैलबंडी जाण्यापुरता रस्ता शिल्लक राहिला. याच कच्च्या रस्त्यावरून चिखल, काटे, गोटे तुडवित मार्गक्रमण नागरिक करतात. पावसाळ्यात तर भयानक हाल होतात, रस्त्याअभावी गावात वाहने, साधी दुचाकीसुद्धा जात नाही. आजारी रूग्णांना खाटेवर टाकून मुख्य रस्त्यावर अणावे लागते. तसेच तलावाच्यो वेस्ट वेअरच्या पाण्यातून मार्ग शोधावा लागतो.

Web Title: Road to Shrirampur residents due to lack of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.