वणीतील अतिक्रमणाला राजाश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:26 PM2019-01-03T21:26:29+5:302019-01-03T21:27:02+5:30

शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना वणी शहरात मात्र अतिक्रमण हटावबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही.

Rajshaya to encroachment in the forest | वणीतील अतिक्रमणाला राजाश्रय

वणीतील अतिक्रमणाला राजाश्रय

Next
ठळक मुद्देराजकीय दुकानदारी : रस्ते झाले चिंचोळे, बाजारपेठेत पायदळ चालणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना वणी शहरात मात्र अतिक्रमण हटावबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. या अतिक्रमणाला राजकीय अभय असल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावत आहे.
शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असताना हे रस्ते अर्धेअधीक अतिक्रमणाने व्यापले आहे. मुख्य बाजारपेठेत तर कहर झाला आहे. या बाजारपेठेतील रस्त्यांवरून साधी दुचाकी नेतानाही मोठी कसरत करावी लागते. शहरात शिस्त नावाची बाबच उरली नसल्याचा प्रत्यय पदोपदी येतो. बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी रस्ते गिळंकृत केले आहे. बाजाराच्या दिवशी तर रस्त्याने चालणेही कठीण होऊन बसते. एकीकडे रस्त्यावर अतिक्रमण, तर दुसरीकडे या अतिक्रमीत रस्त्यावर आॅटोचालकांचा धुमाकूळ यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. बाजारपेठेत तर रस्त्याच्या अगदी दोनही कडेला दुकाने थाटली जातात. त्यामुळे वाहतुकीची अनेकदा कोंडी होते. याविषयात नगरपालिका प्रशासन मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यामागेही राजकारण असल्याचा आरोप नागरिक करित आहेत. खुपच ओरड झाल्यास अतिक्रमण हटविण्याचा तात्पुरता फार्स करण्यात येतो. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. बाजाराच्या दिवशी आॅटोचालक अरूंद रस्त्यावरून आॅटो चालवितात. यातून अनेकदा किरकोळ अपघातही घडतात. प्रसंगी वादही उद्भवतो. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

पार्किंगचा प्रश्न गंभीर
शहरात पार्किंगची समस्या गंभीर होत आहे. एकीकडे रस्त्यावर व्यापाºयांकडून अतिक्रमण केले जात असताना दुसरीकडे बाजारपेठेत जाणारे नागरिकही दुकानांपुढे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होते.

Web Title: Rajshaya to encroachment in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.