प्रकाश आंबेडकरांवर निवडणूक आयोगाला धमकावल्याचा गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधातील विधान भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:20 PM2019-04-04T20:20:03+5:302019-04-04T20:20:22+5:30

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Prakash Ambedkar's statement against the Election Commission crime | प्रकाश आंबेडकरांवर निवडणूक आयोगाला धमकावल्याचा गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधातील विधान भोवले

प्रकाश आंबेडकरांवर निवडणूक आयोगाला धमकावल्याचा गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधातील विधान भोवले

Next

दिग्रस (यवतमाळ) : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची बुधवारी सायंकाळी दिग्रसमध्ये सभा पार पडली. या सभेतील आपल्या भाषणात अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘आमची सत्ता आल्यास निवडणूक आयुक्ताला दोन दिवस जेलमध्ये टाकू’ असे विधान केले होते.

निवडणूक आयोग प्रचारात पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक याचा उल्लेख करण्यास मनाई करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे विधान केले होते. या विधानाच्या अनुषंगाने दारव्हाच्या उपविभागीय निवडणूक निर्णय अधिका-यांकडून अहवाल मागण्यात आला. त्यात हे विधान केल्याचे स्पष्ट असल्याने आंबेडकरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

निवडणूक विभागाच्या वतीने पंचायत समितीचे शाखा अभियंता विवेक जोशी यांनी यासंबंधी फिर्याद नोंदविली. त्यावरून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध भादंवि ५०३, ५०६, १८९ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे दारव्हाचे उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहीम चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Prakash Ambedkar's statement against the Election Commission crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.