पोलिसांना गुंगारा देऊन चोरटा पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:48 PM2018-03-21T23:48:23+5:302018-03-21T23:48:23+5:30

कारागृहात नेताना चोरट्याने शिरपूर पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

The police escaped with a lump in the hands of the police | पोलिसांना गुंगारा देऊन चोरटा पळाला

पोलिसांना गुंगारा देऊन चोरटा पळाला

Next
ठळक मुद्देकरंजीची घटना : कारागृहात नेताना ठोकली धूम, शोधण्यात रात्र गेली, थांगपत्ता नाही

ऑनलाईन लोकमत
वणी : कारागृहात नेताना चोरट्याने शिरपूर पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी विविध पथकांनी त्याचा शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा हादरुन गेली आहे.
अभय सुधाकर पचारे (२२) रा. रंगनाथस्वामीनगर वणी, असे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला शिंदोला येथील वीज उपकेंद्रातील तार चोरी प्रकरणात पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यातून शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
मारेगाव त्यानंतर पांढरकवडा आणि सध्या तो शिरपूर पोलिसांच्या ताब्यात होता. सोमवारी त्याची पोलीस कोठडी संपली. वणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्याला घेऊन शिरपूर ठाण्याचे जमादार दीपक गावंडे, शिपायी अमोल कोवे एका खाजगी वाहनाने यवतमाळकडे जात होते. करंजी जवळ मळमळ होत असल्याचे अभयने सांगितले.
उलटी करण्यासाठी वाहन थांबताच हातातील बेड्या काढून अभयने पलायन केले. अचानक घडलेल्या या घटनेने पोलिसांची पाचावर धारण बसली. या अवस्थेत त्यांनी अभयचा पाठलाग केला. त्यांना करंजी येथील तरुणांनीही मदत केली. मात्र अंधार असल्याने त्याचा थांगपत्ता लागला नाही.
त्यानंतर जमादार दीपक गावंडे यांनी घटनेची माहिती शिरपूर ठाणेदार सागर इंगोले यांना दिली. ते पथकासह करंजीकडे रवाना झाले. पांढरकवड्याचे पोलीस निरीक्षक असलम खान ही आरोपीच्या शोधासाठी करंजीत आले. याप्रकरणी दीपक गावंडे यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली.
सर्च मोहीम सुरूच
पोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या अभयच्या शोधात मंगळवारी रात्रभर पोलिसांनी सर्च मोहीम राबविली. त्यांना करंजी येथील काही तरुणांनी मदत केली. संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र कुठेही थांगपत्ता लागला नाही. बुधवारी सायंकाळपर्यंत आरोपीचा शोध जारी होता.

Web Title: The police escaped with a lump in the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.