पश्चिमेला प्रवेशद्वार असलेले पांढुर्णाचे केदारेश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:56 PM2017-07-30T23:56:52+5:302017-07-30T23:57:17+5:30

साधारणत: शिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असते. परंतु विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील केदारेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे.

pasacaimaelaa-paravaesadavaara-asalaelae-paandhauranaacae-kaedaaraesavara-mandaira | पश्चिमेला प्रवेशद्वार असलेले पांढुर्णाचे केदारेश्वर मंदिर

पश्चिमेला प्रवेशद्वार असलेले पांढुर्णाचे केदारेश्वर मंदिर

Next
ठळक मुद्देआज श्रावण सोमवार : धार्मिक उत्सव, विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान

अखिलेश अग्रवाल।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : साधारणत: शिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असते. परंतु विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील केदारेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. सर्व शिव मंदिरात वैशिष्टपूर्ण असलेल्या या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची मांदियाळी जमली आहे.
पुसदचा परिसर हा निसर्गराजीने बहरलेला आहे. पुसदपासून अवघ्या ३६ किलोमीटर अंतरावर पांढुर्णा (केदारलिंग) देवस्थान आहे. पश्चिम वाहिनी पैनगंगा नदी या शिवतीर्थाला प्रदक्षिणा घालून वाहते. पांढुर्णाचे पाच लिंगी शिव मंदिर म्हणजे भक्तांची काशी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे जाण्यासाठी पुसदहून खंडाळा, रोहडा, बेलोरा मार्गे जाता येते. मंदिरापर्यंत डांबरी रस्ता असल्याने भाविकांना त्रास होत नाही. श्रावण महिन्यातील सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
पुसद परिसरातील जुन्या हेमाडपंथी मंदिरापैकी एक केदारेश्वर मंदिर आहे. पांडवांच्या पदस्पर्शाने पावण झालेले हे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीचे असल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथात असल्याचे मंदिराचे पुजारी बळीराम महाराज यांनी सांगितले. पांडववन म्हणून या डोंगरमाळास ओळखले जाते. वनवासात असताना पांडवांचे वास्तव्य या परिसरात असल्याचा पुरावा ग्रंथात आहे. श्रावण महिन्यात दरदिवशी या मंदिरात सांग्रसंगीत पूजा करण्यात येते. निसर्गाच्या कुशीतील अप्रतिम असे हे धार्मिक स्थळ होय.

असे आहे मंदिर
हेमाडपंथी बांधणीच्या या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. गाभाºयात उत्तरमुखी शिवलिंग असून पंचधातूची भगवान शंकराची मुखमूर्ती आहे. मंदिर परिसरातील टेकडीवर भाविकांसाठी जुन्या काळात बांधलेली धर्मशाळा आहे. बाहेरगावहून आलेल्या भाविकांसाठी विश्रांतीचे ते ठिकाण झाले आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते.

Web Title: pasacaimaelaa-paravaesadavaara-asalaelae-paandhauranaacae-kaedaaraesavara-mandaira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.