यवतमाळ जिल्ह्यात ओव्हरटेकच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 02:39 PM2019-05-21T14:39:41+5:302019-05-21T14:40:18+5:30

ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रकवर ट्रक आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डिगडोह फाट्याजवळ घडली.

One killed in an accident in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात ओव्हरटेकच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एक ठार

यवतमाळ जिल्ह्यात ओव्हरटेकच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एक ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रकवर ट्रक आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डिगडोह फाट्याजवळ घडली. सतीशकुमार विद्यासागर (२८) रा. सेंकडू (तामिळनाडू) असे मृताचे नाव आहे.
आर.जे.११/जीआर-६८०५ या क्रमांकाच्या ट्रकला ओव्हरटेक करताना टी.एन.३४/एसी-१३५९ या क्रमांकाचा ट्रक धडकला. यामध्ये चालक सतीशकुमार जागीच ठार झाला. घटनेची माहिती किन्ही येथील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी वडकी पोलिसांना दिली. ठाणेदार प्रशांत गिते व सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवचिकित्सेसाठी रवाना करण्यात आला.

Web Title: One killed in an accident in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात