शिक्षण विभागाच्या निर्णयात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:47 PM2017-08-21T23:47:13+5:302017-08-21T23:47:33+5:30

शासनाने शिक्षण विभागासाठी अनेक नविन निर्णय घेतले. परंतु काही निर्णय हे अत्यंत चुकीचे निर्णय आहेत.

Make changes to the education department's decision | शिक्षण विभागाच्या निर्णयात बदल करा

शिक्षण विभागाच्या निर्णयात बदल करा

Next
ठळक मुद्देरणजित पाटील : पांढरकवडा येथे पदवीधर मतदारांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शासनाने शिक्षण विभागासाठी अनेक नविन निर्णय घेतले. परंतु काही निर्णय हे अत्यंत चुकीचे निर्णय आहेत. या निर्णयामुळे जर शिक्षकांवर व शिक्षण संस्थांवर गंडांतर येणार असेल, तर त्यामध्ये बदल करण्यात येईल. यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करु, प्रसंगी शासनाशी दोन हात करू, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विषद केली.
स्थानिक राहुल भवनमध्ये पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील पदवीधर मतदारांतर्फे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर होते. ना.पाटील म्हणाले, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याची किमया अण्णासाहेब पारवेकरांनी साधली. त्याचे परिणाम निवडणुकीच्यावेळी दिसून आले.
यावेळी मंचावर पं स. सभापती इंदू मिसेवार, उपसभापती संतोष बोडेवार, बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, उपसभापती जानमहम्मद जिवाणी, प्रा.बापुराव भोंग, न.प.उपाध्यक्षा सुनंदा देशमुख, खविसंचे उपाध्यक्ष मदन जिड्डेवार, जि.प.सदस्य गजानन बैजंकीवार, अनिल तिवारी आदी उपस्थित होते.

Web Title: Make changes to the education department's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.